श्री विठ्ठल बिरदेव प्रसार समिती
कोल्हापूर जिल्हाला हातकणंगले तालुका , तालुक्याच्या बाजूला पट्टण कोडोली गावाला... कोल्हापूर पासून 18 किमी आमचे गाव आहे जे आत्ता यात्रेमूळे जगप्रसिद्ध झाले आहे .
अनेक देशांतून व राज्यांतून लोक गावात श्री विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त अनेक भक्त तसेच फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी व गावाची जपून ठेवलेली परंपरा अनुभवायला येतात. श्री विठ्ठल हे विष्णू तर बिरदेव शंकराचे अवतार होत. यात्रेस महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश-तेलंगाणा येथील भक्तगण लाखोंच्या संख्येने येतात;
गावात येणारा प्रत्येक जण मुक्त हस्ते हळद-भंडारा उधळत श्री विठ्ठल बिरदेवांच्या नावाचा जयघोष करतो. गावच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे फरांडे बाबा यांचे हेडाम नृत्य आणि त्यांची भाकणूक, म्हणजेच भविष्यवाणी, संकट याचा अंदाज व्यक्त करणारी असते.
यात्रेस या 8 ते 10 वर्षात जागतिक स्तरावर खूप मोठे वलय लाभले. गावाने जुनी संस्कृती, परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. हे सर्व जगासमोर आणण्यास फोटोग्राफर्सची खूप मोठी भूमिका आहे.
Email -
[email protected]