नमस्कार,
महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच प्रेरित करीत आला आहे. हा इतिहास म्हणजे पराक्रमाची उत्तुंग ध्वजा. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही हाही एक इतिहास आहे. निरक्षरं मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला मात्रं साक्षरं मराठे त्यापासून बेदखल राहिले कि काय? अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे. पण! शिवशंभू चरित्राचं कर्तृत्वं ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं एकवटतो एवढी एकचं गोष्ट तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत. या गौरवशाली इतिहासातील काही प्रसंग इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकाद्वारे उकलण्याचा आणि सोशल मीडिया मार्फत सर्वांना समजावा म्हणूनच हा एक प्रामाणिक प्रयत्न.
प्रत्येक गोष्टीचा संदर्भ देत महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत शौर्यगाथा या चॅनेल द्वारे पोहचवत राहू..
For business enquiries -
[email protected]Mb. No. 8805476943
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🚩