ताई हा त्रास तर काहीच नाही ,मी माझ्या आई वडीलांची एकुलती एक मुलगी आहे . माझ लग्न 2009 ला झाले आहे पण माझा जो छळ केला आहे ना तो माझ्या आजीच्याही काळात बायकांना झालेला नसेल . पण माझ माहेर लांब असल्यामुळे आई वडील काळजी करतील म्हणून मी त्यांना सांगु शकत नव्हते.माझे सासरे पोलीस होते ,मोठे दिर पोलीस आहेत आणि माझे मिस्टर शिक्षक यांच्या सर्वासमोर माझी सासू मला खायला आणि चहा सुध्दा द्याची नाही आणि ढोरासारखे काम पण करुन घ्याची ,ज्या दिवशी माहेरी जायची ना आईला खिचडी बनवायला सांगायची आणि खिचडीचा ताट समोर आला कि तो बघून मी इतकी रडायची की माझा हुंदका आवरताच येईना आई वडील विचारायचे पण मी त्यांना जास्त काहीच सांगत नसायची कारण मला परत जावच लागणार होते आजून त्याना काळजी वाटली असती. सासरी माझ्याकडे मोबाईल पण नव्हताच . पण आता मी वेगळी रहाते आता माझे सर्व चांगले आहे ,माझा मुलगा 13 वर्षाचा आहे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली पण अजूनही सासू नातूला नातू मानत नाही आणि सुनेला सुन म्हणत नाही माझ्या लग्नात आमची हजार लोक होती आणि त्याची दहा पण नव्हती . 350 ते 400 किलो मिटर वर माझे माहेर आहे .मुलगी बघण्या पासून ते साखरपुडा ,सुपारी फोडण्या पासून लग्न होण्या पर्यत सरवा कार्यक्रम माझ्या आई वडीलांनी च केला तरी सुध्दा हा प्रकार . पण आता माझे मिस्टर मला खुप जीव लावतात आता मी खुप आनंदात आहे. आधीचे फोटो पाहीले ना तर रडू आवरत नाही ताई.