बासरीवरती रंगवी, आठवणींचा गीत काँलेजच्या त्या दिवसांत, होता मित्र अद्वितीय त्याच्या हातात बासरी, जणू स्वप्नांचा वारा त्याच्या सुरात होती, मनातल्या भावनांच्या धारा गर्दीतही एकटेपणाचा सोबती तो, त्याच्या सुरांनीच लपवले दु:खाचाअडथळा क्षण एक नवा होता, प्रत्येक धुंद वारा त्याच्या बासरीच्या गजरात, मनही वाहत जरा आजही आठवते, ती लय, ते सूर मित्राच्या बासरीतून झरलेले, भावनांचे पूर कदाचित पुढे वाटा निराळ्या झाल्या पण आठवणींमध्ये, तो अजूनही बासरीत गूढ जुळवतो आहे माझा तो मित्र बासरीवाला, तो सुरांचा राजा आयुष्याच्या त्या संगीताने, माझे हृदय सांभाळत राहिला अशा माझ्या मित्रास बासरीचे आणखीन सुर जुळावे म्हणून शुभेच्छा कवि संजय डांगे