अतिशय मनापासून नाट्यसंगीताचा ठेवा उलगडून दाखवतात आफळेबुवा !!. किती आभार मानले तरी कमीच. त्यांच्या पुढाकाराने संगीत नाटकांचे युग पुन्हा यावे असे वाटते. कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. साधारणतः नाट्यगीतांचे अर्थ कुणीच सांगत नाही. आफळेबुवा हे अतिशय लीलया आणि प्रभावीपणे करतात. "ऋणानुबंधाच्या..." या गीताचा अर्थ खूप सुंदर सांगितला आहे आणि गायलंही उत्तम .... "हे सुरांनो चंद्र व्हा ..." या गीताचा अर्थ सुद्धा खूप सुंदर सांगितला आहे आणि गायलंही उत्तम .. गौरी पाटील या सुद्धा अतिशय तन्मयतेने गातात आणि त्यांचे गाणे हृदयाला भिडते.. श्री. चारुदत्त आफळे हे मराठी नाट्यसंगीताचा हिरा आहेत. त्यांची साधना अत्यंत उच्च दर्जाची आहे, त्यांचे मानापमान नाटक युट्युब वर आहे. यामध्ये अतिशय उत्तम गायन त्यांनी केले आहे. जरूर पहा.. विडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद...