अंकाई टंकाई किल्ले | नाशिक | Ankai Tankai Fort | Yeola | Nashik |

  Рет қаралды 1,375

Jay adventures

Jay adventures

Күн бұрын

अंकाई
अंकाई आणि टंकाई हे जोड किल्ले आहेत. एकाच खिंडीने वेगळ्या झालेल्या दोन डोंगरांवर हे किल्ले बांधलेले आहेत. या डोंगररांगेजवळुन जाणार्‍या सुरत - औरंगाबाद व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. या किल्ल्यांवरील अगस्ती मुनींचा आश्रम, ब्राम्हणी, जैन लेणी या किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात.मनमाड पासून केवळ १० किमीवर आणि धार्मिक स्थान असल्यामुळे किल्ल्यावर सुट्टीच्या दिवसात भाविकांचा वावर असतो. त्यामुळे सकाळी लवकर अंकाई किल्ला पाहुन मग टंकाई किल्ला पाहावा. कारण टंकाई किल्ल्यावर भाविक/पर्यटक फ़ारसे येत नाहीत.
अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे.
अनकाई डोंगरावर अगस्ती ऋषींचा आश्रम होता. किल्लावर असलेली ब्राम्हणी (हिंदु) लेणी आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली दहाव्या ते बाराव्या शतकातील जैन लेणी किल्ल्याच प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली अस मानल जात. इ.स. १६३५ मधे मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत - औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्वाचा किल्ला होता. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहा नुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.इ.स. १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकुन घेतला.
अंकाई गावातून किल्ल्याच्या पायथ्याच्या पर्यंत रस्ता आहे. हा रस्ता शाळे जवळुन जातो. तेथे रस्त्याच्या बाजुला उघड्यावर गणेश मुर्ती व काही वीरगळी ठेवलेल्या आहेत. अशीच एक मोठी वीरगळ शाळेच्या विरुध्द बाजूस आहे. या चार फूट उंच चौकोनी वीरगळीवर खालच्या पट्टीवर चारही बाजूंना शिल्प कोरलेली आहेत. त्यात रानडुकराची शिकार करतानाच शिल्प आहे. वरच्या बाजूस सतीचा हात कोरलेला आहे. ही वीरगळ पाहून परत शाळेपाशी येउन किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जावे. रस्ता संपतो तिथुन किल्ल्याच्या पहील्या टप्प्यावरील जैन लेण्यांपर्यंत पुरातत्व खात्याने पायर्‍या बांधलेल्या आहे. पायर्‍यांनी आपण १० मिनिटात लेण्यांपाशी पोहोचतो. लेणी दोन स्तरांवर बांधलेली आहेत. पहिल्या स्तरावर दोन लेणी आहेत. त्यातील दुसर्‍या लेण्याच्या समोर पाण्याच टाकं आहे. या लेण्यामधे मुर्ती किंवा कोरीवकाम पाहायला मिळत नाही. ही २ लेणी पाहुन १० ते १५ पायर्‍या चढुन गेल्यावर ५ लेणी खोदलेली पाहायला मिळतात. हि लेणी दहाव्या ते बाराव्या शतकात कोरलेली असावीत. यातील पहिली दोन लेणी दोन मजली आहेत. त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली आहे. सभा मंडपाच्या व्दारशाखेवर सुंदर कोरीवकाम आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. खांबांच्या टोकाला छताला आधार देणारे यक्ष कोरलेले आहेत. छतावर पाकळ्या असलेले सुंदर कमळ कोरलेले आहे. सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावरचे दालन दोन स्तंभांवर तोललेले आहे. दुसर्‍या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजुला यक्षाची मुर्ती आणि उजव्या बाजुला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रुप देण्यात आलेले आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. पहिल्या मजल्यावर जाणारा जिना सभामंडपात आहे. पहिल्या मजल्या वरच्या दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे. जाळीच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठे व्याल कोरलेले आहेत. तिसर्‍या लेण्यात ओसरीत दोन मुर्ती आहेत. डाव्या बाजुची मुर्ती किचकाची आणि उजव्या बाजुची मुर्ती अंबिकेची आहे. पाचव्या लेण्यात तीर्थंकरांच्या मुर्ती आहेत.
लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर आपल्याला दोनही किल्ल्यांच्या मधिल खिंड तटबंदी बांधुन सुरक्षित केल्याच पाहायला मिळत. या तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. ओबडढोबड पायर्‍यांच्या वाटेने १० मिनिटात आपण अंकाई आणि टंकाईच्या पहिल्या दक्षिणाभिमुख प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या बाजुला दोन भव्य बुरुज आहेत. या बुरुजां पासुन सुरु झालेली तटबंदी अंकाई आणि टंकाई या दोनही किल्ल्यांपर्यंत जाते. दरवाजाचे लाकडी अवशेष अजुनही काही प्रमाणात टिकुन आहेत.दरवाजा ओलांडुन आत गेल्यावर पाहारेकर्‍यांसाठी असलेल्या देवड्या दिसतात. पुढे थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर उजव्या बाजुला टंकाई किल्ला , डाव्या बाजुला अंकाई किल्ला आणि समोर वायव्य दरवाजा (मनमाड दरवाजा) दिसतात. या मनमाड दरवाजातून खाली उतरुन त्याची भव्यता अनुभवता येते. अशा प्रकारे दोन डोंगरामधिल खिंडीचे संरक्षण करण्यासाठी दोन प्रवेशव्दारांची आणि तटबंदीची रचना केलेली येथे पाहायला मिळते.
टंकाई
टंकाईवर जाण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. जिथे कातळ खोदण शक्य नाही तिथे पायर्‍या बांधुन काढलेल्या आहेत. या कातळकोरीव पायर्‍यांनी किल्ला चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजुला एक छोट टाक दिसत त्याच्या पुढे एक मोठ टाक आहे. या टाक्यात पाणी आणण्यासाठी वर पासुन या टाक्यापर्यंत कातळात पन्हाळी खोदलेली दिसते. थोड्या पायर्‍या चढुन गेल्यावर डाव्या बाजुला पाण्याची तीन मोठी टाकी एकापुढे
#ankaifort
#tankaifort
#ankaitankaifort
#forts

Пікірлер: 4
@PinkisKitchenDance_82.20-9.
@PinkisKitchenDance_82.20-9. 18 күн бұрын
Best video
@anticcollecter1984
@anticcollecter1984 18 күн бұрын
Nice information video
@jayadventures7258
@jayadventures7258 13 күн бұрын
Thanks
@shamlimbore9406
@shamlimbore9406 13 күн бұрын
.....Awesome.....💓
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 4,9 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 138 МЛН
Космические гипотезы: Как возникло все?
3:51:04
Космическое путешествие
Рет қаралды 677 М.
🚩अंकाई किल्ला,मनमाड, नाशिक 🚩ANKAI FORT-MANMAD-NASHIK🚩किल्ला क्रमांक:-४२🚩
11:12
इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा
Рет қаралды 49 М.
2000 Pound Table
46:50
Blacktail Studio
Рет қаралды 659 М.
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН