Рет қаралды 554
१ ) आकर्षण
१ ) अमेरिकेचं आकर्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आहे. तरुण पिढीला तिथल्या सोयी-सुविधा,आकर्षक पगार,तिथले राहणीमान आकर्षित करते. थोरांना पण नवीन देश कसा बरे असेल ? याचे आकर्षण असतेच. आपल्याला नाही जमले तर निदान मुलं जाताहेत तर जाऊ दे ! त्यांच्या निमित्ताने आपणही अमेरिका बघू ! असा विचार बहुतेक मध्यम वर्गीयांच्या मनांत येतो.
हल्ली ना ! काय झालंय माहिती का ?
बहुतेक जण,जायचंच म्हणतो अमेरिकेला !
शिकायला तरी,किंवा नौकरीला तरी !
आकर्षण वाढलय त्या अमेरिकेचं भारी !
मधली एक पिढी अशी होती
प्रौढ वयातील चाकरमानी
जात होती आखाती देशी
महत्वाकांक्षा घेऊन संपन्नतेची
तो प्रभाव काळाच्या ओघात कमी झाला !
तर आता अमेरिकेचा चांगलाच वाढला !
तरुण पिढी अमेरिकेला ओढली गेली !
तिथल्या सुविधांनी आकर्षित झाली !
त्यात पालक देखील सामील झाले !
लेकरांचे भविष्य उज्वल होईल म्हणाले !
जमा पूंजीचे पाठबळ उभे करीत गेले
आणि अमेरिकेला उडाली विमाने
पण सोपे का आहे तिथे जाणे ?
मार्गात असती अनंत अडथळे
आर्थिक स्थिती भक्कम पाहिजे !
स्वकीयांना सोडून रहाता आले पाहिजे !
पासपोर्ट, व्हिसा, वगैरे वगैरे !
आरोग्य तपासणी, लस घेणे, वगैरे वगैरे !
जबाबदारी पेलता येणे, वगैरे वगैरे !!
इतरांशी जुळवून घेता येणे, वगैरे वगैरे !!
विद्यार्थ्यांना तर विविध परीक्षा द्याव्या लागतात
मार्क्स पण चांगलेच मिळवावे लागतात
सोबत जास्तीचे डॉलर्स न्यावे लागतात
मनातील भावना थोपवून ठेवाव्या लागतात
कौतुक आहे या नवीन पिढीचे !
शिवाय त्यांच्या पालकांचे !
सर्व दिव्यातून जायची तयारी असते
उत्कर्ष साधण्याची दुर्दम्य इच्छा असते
उज्वल भविष्यासाठी अमेरिकेला जायची ओढ असते
त्यासाठीच अमेरिकेला जायची ओढ असते