Рет қаралды 277
२५ ) कोरोनाचा कारनामा
२५ ) २०२० ला अचानकच कोविड चे virus अती वेगाने पसरले आणि मृत्यूचे थैमान सुरु झाले. कुटुंबांची वाताहात झाली,वयस्क मागे राहिले,तरुणांची यात्रा निघाली. पालकांना मुलांची काळजी,तर मुलांना पालकांची काळजी,अशी परिस्थिती झाली. सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत असलेल्या भारतीयांची पण काही वेगळी स्थिती नव्हती.
आली आली महामारी
अख्ख्या जगाला पडली भारी
लहान नाही थोर नाही
गरीब नाही कि श्रीमंत नाही
मुके प्राणी देखील सुटले नाही
कोरोनाची दहशत निर्माण झाली
चीन मध्ये उदभवलेला हा
Virus होता जाम देखणा
परी अज्ञात होता याचा दुष्टपणा
थैमान याचे दिसू लागता
सुरु झाली उपाययोजना
अथक प्रयत्न लागले शास्त्रज्ञांना
त्यावरची लस शोधून काढताना
बाजारहाट बंद,ऑफिसेस बंद
curfew मुळे सगळेच बंद
असा हा lockdown खूप लांबला
आणि माणूस घरात कैद झाला
एक कारणच मिळाले डिप्रेशन यायला
आणि मुद्दा सापडला divorce घ्यायला
मोठा फटका उद्योजकांना बसला
नोकरदार तरुणवर्ग नौकरीला मुकला
भारत,यूरोप,अमेरिका,असो देश कुठला
आर्थिक व्यवस्थेचा, पुरता बोजवारा उडाला
अमेरिकेतील भारतीय हवालदिल झाला
कोणाकडे जावे मदत मागायला ?
सगळेच संकटात सापडले होते
इथे तर सरकारही आपले नव्हते
पती-पत्नी दोघांचे जॉब गेले
घराचे हप्ते फेडायचे कसे ?
मुलांचे शिक्षण ? insurance ?
भारतात परत जायचे तरी कसे ?
जशी विमानसेवा सुरु झाली
काही जणांनी हिम्मत केली
गाशा गुंडाळून गेले विमानतळावरती
तोच एक बातमी पसरली वाऱ्यासारखी
भारताने एन्ट्रीच बंद करून टाकली
अमेरिकन पासपोर्ट असलेल्यांची
आता तर आभाळच कोसळले
आई-वडील भारतीय पासपोर्टवाले
पण मुलं अमेरिकेत जन्मलेले !
नौकरी गेली, अमेरिकेत राहायचे कसे ?
मुलांना एन्ट्री नाही, सोबत न्यायचे कसे ?
त्यांना ठेवणार तरी कुठे ? नेणार तरी कसे ?
ज्यांची ज्यांची नौकरी शाबूत राहिली !
ती मित्रमंडळी मग धावून आली
कोणी मुलांची जबाबदारी घेतली,
कोणी जमेल तशी आर्थिक मदत केली
एकमेकांना धरून राहिली मुळांसारखी
जसे या कोरोनाचे कारनामे संपले,
तसे अमेरिकेला परत ओघ सुरु झाले
कोरोनानंतर अमेरिकेला पुनःश्च ओघ सुरु झाले
कोरोनानंतर तरुणांचे पुनःश्च ओघ सुरु झाले