Arnav मुंज सोहळा १० मे २०२३ | Cinematic Teaser |

  Рет қаралды 374

Arnav Kulkarni creation

Arnav Kulkarni creation

Жыл бұрын

मुंज/उपनयन हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार, हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठीच सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. या संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे.
काही वर्षांपर्यंत फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व काही अंशी वैश्य वर्णांतील पुरुषांना हा संस्कार करवून घेण्याचा अधिकार असे.
1. उपनयन म्हणजे काय ?
गायत्री मंत्राचा उपदेश, ‘देवसवितरेष ते ब्रह्मचारी’ आणि मंगलाष्टकानंतर बटूचे आचार्य जे मुखनिरीक्षण करतो, यापैकी प्रत्येकाला उपनयन समजणारे तीन पक्ष होतात. वेदाध्ययनाला सुरुवात या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात येते. आपल्या हिंदू धर्माचा, या विश्वाचा मूळ जो प्रजापती त्याला बटू (कुमर) अर्पण करणे हा ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्याचे सोळा संस्कारांत परंपरा या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. यज्ञोपवित जानवे वगैरे प्रजापतीचे रूप घेण्याची साधने आहेत. उपनयन म्हणजे आपला मूळ जो प्रजापती, आत्म्याने त्याच्या जवळ जाणे, त्याची वस्त्रे, त्याची विद्या आपण मिळविण्याचा प्रयत्न करणे, केवळ या प्रमाणावरून पाहता ज्यांना वेदाधिकार पाहिजे असेल त्यांनी हा संस्कार करावयाचा आणि वैदिक व्हावयाचे असा मूळ उद्देश उपनयन संस्कारात दिसतो. सर्व सोळा संस्कारांत उपनयन संस्कार सर्वात श्रेष्ठ होय. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच त्याला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो.
2. महत्त्व
शास्त्रतः हा संस्कार त्रैवर्णिकांना करण्याचा अधिकार आहे. परंतु सध्या हा संस्कार विशेषतः ब्राह्मणात, फार थोड्या क्षत्रियांत आणि वैश्यांत करण्यात येतो. याला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो, असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.
उपनयन म्हणजे गुरूंच्या जवळ जाणे. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक होते. त्या नियमांनी स्वत:ला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. सारांश, ब्रह्मचारी म्हणून स्वत:च्या शरीराला, मनाला आणि बुद्धीला जाणीवपूर्वक वळण लावावे लागते. ज्याप्रमाणे कंदिलाच्या बाहेरची काच जर खराब असेल तर दिव्याच्या वातीचे तेज बाहेर नीट पडत नाही; त्यासाठी कंदिलाची काच स्वच्छ असावी लागते, त्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जातो आणि ज्ञानशक्ती प्रदीप्त होते आणि प्रज्ञेचा विकास होतो. १ भारतीय संस्कृतीत प्रत्येक आश्रमानुसार ब्रह्मचर्याचे स्वरूप वेगवेगळे सांगितले आहे. पण प्रत्येक टप्प्यावर ब्रह्मचर्याचा अभ्यास करीत असताना आपली संयमशक्ती वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. यासाठीही योगाभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.

Пікірлер
Traditional Maharashtrian Munj(Thread ceremony) Chi.Shreeansh Kulkarni
6:21
Dipti Nimkar Kulkarni
Рет қаралды 340 М.
Leo's Performance at Balgandharva !!!
5:01
Arnav Kulkarni creation
Рет қаралды 76
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 138 М.
#plescodandiya2024 #dancefloorstudio #foryou #subscribe
5:13
Arnav Kulkarni creation
Рет қаралды 43
Ganpati Festival Dance Performance #bappamorya #dancelover
4:30
Arnav Kulkarni creation
Рет қаралды 192
Jay waghmare munj cinematic video || 2022
0:43
Hrudaya films
Рет қаралды 525
02 Haldi Vaibahav & Poonam Traditional Wedding
11:17
Vaibhav Mahadik
Рет қаралды 52
Ronit | Rohan Upanayana Cinematic | BASAVA | GUDUR |
15:02
Balaji Studio Hubli
Рет қаралды 82
House Warming Ceremony...! Mr. & Mrs. Dr. Zargad & Family. HERAMBH KALAKRUTI
7:42
glimpse of our wedding 💍❤️
9:06
Priyanka khairnar
Рет қаралды 4
Shounak & Aditi | wedding Film |
6:20
CineSutra Productions
Рет қаралды 24