No video

Ashta Bhavai -MUKHOTE | मुखवटे २०२४ | ऐतिहासिक भावई

  Рет қаралды 4,822

Ojas Shivmore

Ojas Shivmore

Ай бұрын

Ashta Bhavai -MUKHOTE | मुखवटे २०२४ | ऐतिहासिक भावई
Follow me on Instagram -
ojas_shivmore
आळूमुळू -
• ASHTA BHAVAI ALUMULU |...
चटक्या मटक्या -
• Ashta Bhavai - CHATKYA...
जोगण्या उत्सव -
• Ashta Bhavai - Jogani ...
लोट -
• Ashta Bhavai - Lot | ...
ऐतिहासिक भावई
सहावा दिवस पहाटे - मखोटे
लोट मध्ये देवीस दैत्य सापडला आणि देवीने त्यास युद्धासाठी आव्हान केले. देवी (मुखवटे) व दैत्य (आरगडी) यांच्यातील युद्ध ज्येष्ठ अमावस्येला होते. देवी चामुंडाचे अक्राळविक्राळ, भयंकर, रागीट, उग्र रूप असणारे "मुखवटे" हे वर्षभर बंद खोलीत असतात. ते आजच्या दिवशीच रात्री बाहेर काढले जातात. पहाटे चौडेश्वरी मंदिरात दोन सुतार खेळगडी जे आदल्या दिवशी जोगणी झालेले होते ते पारंपारिक वेशभूषेत रंगून मंदिरातून युद्धासाठी बाहेर पडतात. त्यांच्या डोक्यावर देवीचे मुखवटे अर्थात मखोटे असतात. मुखवट्यावर मोगऱ्याच्या कळ्यांपासून सुपावर विणून केलेली विशिष्ट अशी फुलांची सुंदर नक्षी असते. उजव्या हातात उंच काठी व दुसऱ्या हातात वाटी असते. सजून- जून हे दोन खेळगडी नगारे, रणशिंग, संबळ, चौंडके, कैताळ, पावा, छत्र, चामरे अशा वाद्यांच्या गजरात सर्व लवाजम्यासह मंदिरातून आरगड्यासोबत युद्ध करण्यासाठी बाहेर पडतात. पहाटे दिवटीच्या प्रकाशात देवीचे तिच्या सर्व लवाजम्यासह आगमनाचे दृश्य हे अतिशय विलोभनीय असते. देवीसोबत एक सुतार खेळगडी "आरगडी" रूपात (दैत्य) मंदिराबाहेर रंगून पारंपरिक वेशभूषेत तयार होतो. त्याच्या कमरेपर्यंत रंगीत चोळणा, हातात काठी व डोक्यावर रंगवलेले लिंबाच्या पाल्याने सजवलेले सूप असते. गावातील गणपती मंदिर पासून मारुती मंदिरापर्यंत ठराविक पाच ठिकाणी मखोटे खेळले जातात. यात्रेचा सर्वात मुख्य दिवस असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भाविक आलेले असतात. त्यांच्या सोयीसाठी हा खेळ पाच ठिकाणी खेळला जातो जेणेकरून तो सर्वांना पाहता यावा.
ज्या ठिकाणी खेळ होणार असतो तिथे वरती लिंबाचे तोरण बांधून मुखवटे आणि आरगड्याच्या हद्दी निश्चित केलेल्या असतात.
आरगड्याची हद्द देवी शेवटच्या खेळापर्यंत पार करत नाही. देवी युद्धासाठी येण्याअगोदर सर्वात पुढे नगारा वाजत येतो. नगारा वाजवून देवी युद्धासाठी येत आहे याची एक प्रकारे दवंडी पिटवली जाते. देवी (मखोटे) आणि आरगडी यांच्यात समोरासमोर युद्धास सुरवात होते. एका ठराविक पद्धतीने देवी नृत्य करत पाठीमागे सरकत असते. नृत्यासोबत छत्र, चामरे, रणशिंग, चौंडके, कैताळ, पावा यांचे विशिष्ट संगीत वाजत असते. या संगीतातून सर्वाना ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळत असते. खेळगड्यात देवीचा संचार असतो. सर्व वाद्यवृंद देवीच्या सोबत पाठीमागे सरकत नृत्य करत असतो. संगीतासोबत देवीच्या डोक्यावरील मुखवट्याची पण एक विशिष्ट लयीत हालचाल होत असते. जसजसे देवी नृत्य करत पाठीमागे सरकते, तसतसे आरगडी आपली हद्द सोडून पुढे सावधपणे येत असतो. मखोटे आणि रगडी मध्ये ठराविक अंतर असते. मखोटे पाठीमागे सरकत असताना आरगड्यावर लक्ष ठेऊन असते. तसेच आरगडी ही मखोट्यावर वर लक्ष ठेऊन असतो. अशात एकदम सर्वांना हुलकावणी देत मखोटे आरगड्यास पकडण्यासाठी पळते. जसे मखोटे त्याला पकडण्यासाठी पळते तसे आरगडी ही त्याच्या हद्दीत परत पळत जातो. जेणेकरून तो मखोटेच्या हाती सापडू नये. मखोट्याने आरगड्याला पकडण्यासाठी पळत जाणे यालाच "धावा घेणे" असे म्हणतात. याचाच अर्थ देवी दैत्याचा पाठलाग करुन त्याला पकडत आहे. दोन मखोटे आलटून पालटून धावा घेतात. एका ठिकाणी साधारण 2 तास हा खेळ चालतो. युद्धासाठी रणांगणावर जाण्यापूर्वी संपूर्ण रणांगणाची टेहळणी करुन डावपेच आखले जातात त्यास "रणशोधन" म्हटले जाते. पाच ठिकाणी धावा होणार असतात त्यामुळे पुढच्या ठिकाणी धावा होण्याआधी मागच्या ठिकाणी रण शोधन होते. देवीचे मखोटे उंच उडवून रणांगणाची पाहणी देवी करते. यावेळी गर्जना, आरोळी दिली जाते यास "रण शोधणे" असे म्हणतात आणि मगच पुढच्या ठिकाणी धावा होतात. यावेळी दैत्य मारला गेला म्हणून विशिष्ट अशी पारंपरिक देवी स्तुतीची गाणी म्हटली जातात. "दैत्य झाले भारी, धावुनी आली चौंडेश्वरी! आईने अवतार घेतला दैत्यासाठी, दैत्य धरिला, त्यास डाव्या अंगठ्या खाली दडपला, दैत्याचे केले निर्दालन, भक्त जणांचे केले प्रतिपालन, बोला! भगत राजा हर हर हर ...!" अशा प्रकारे आरोळ्या ठोकल्या जातात.
I Hope Enjoyed This Video
Hit likes
And do Subscribe to my Channel
Thank you so much for watching
God bless you all.
Lots of ❤️
#bhavai #mukhota #मुखवटे #ashta #yatra #jatra #marathivlog #dailyvlog

Пікірлер: 6
@harshwardhandesai3575
@harshwardhandesai3575 Ай бұрын
All shooting and quality ek number ❤❤❤❤❤
@user-ue5yb2ue9f
@user-ue5yb2ue9f 28 күн бұрын
अप्रतिम असे सादरीकरण.आम्हाला घरातुनच भा‌वई जत्रा पाहायला मिळाली.तुमचे खूप धन्यवाद.👌👌
@rohitbhaubamane293
@rohitbhaubamane293 18 күн бұрын
Mast editing
@ashokbansode5713
@ashokbansode5713 Ай бұрын
Aapaliiii Bhavaiiii
@rahulsuryagandh9388
@rahulsuryagandh9388 Ай бұрын
Awesome 👍❤
@shriraskar4866
@shriraskar4866 Ай бұрын
🎉🎉🎉🎉
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 36 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 24 МЛН