Рет қаралды 7,469
#History_of_Aurangabad #BhadkalGate #MalikAmbar
औरंगाबादची स्थापना करणारा मलिक अंबर! चारशेवर्षापूर्वी या परिसरात उभी राहिलेली एक नागरी, या नगरीची पहिली भव्य वास्तू म्हणजे ‘भडकल गेट’. ऐतिहासिक शहरात वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमुने बघायला मिळतात आणि भडकल गेट वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवाजांच्या शहरातील अद्वितीय भव्य विजयस्मारक म्हणजे हे गेट. ख्यातनाम वास्तुविशारद आणि औरंगाबादच्या ऐतिहासिक वास्तू कलेचा प्रचंड अभ्यास असलेले अजय कुलकर्णी सांगतायत औरंगाबादची कहाणी, वास्तूरचना, शैली आणि तत्कालीन संदर्भ घेऊन येणाऱ्या घटना..एका विलक्षण सिरीजची ही सुरुवात.
मलिक अंबर. इथिओपियातून आलेला गुलाम ते सैनिक ते सेनापती ते उत्कृष्ट लढवय्या ते नगररचनाकार अशी त्याची ओळख. त्याच्याबद्दल ममत्त्व वाटण्याचं कारण म्हणजे तो औरंगाबादचा निर्माता आहे. त्याने उभारलेल्या वास्तू, पाणी योजना आजही ४०० वर्षांनंतरही आपण बघू शकतो. ४० बाय ४० बाय ४० बाय ४० फूट आकाराचा भडकल दरवाजा खऱ्या अर्थाने औरंगाबादचा पहिला चिरा... रसाळ, रोचक आणि गुंतवून ठेवणारी भडकल गेटची कहाणी..
#History_of_Aurangabad E-01
#भडकलगेट #मलिकअंबर #औरंगाबाद_नामांतर ##History_of_Aurangabad #CityOfGates #Citygates #IndianHistory #Deccan #thedeccanpole #Malik Ambar # Kharki #Khadki #Mughals # Daulatabad #Nizam Shahi # Aurangzeb #Fatehnagar #Sambhajinagar #OldestGate #BiggestGate #VictoryagainstMughals #medievalcities #ethiopian #Gatearchitecture #Architects #AncientBuildings #Historical #monuments #Hemadpanthi #Nizam_of_Nagar #AurangabadArchitecture #LoveAurangabad #restorationofgates #IndianHistory #Greatarchitecture #Worldheritage #Ellora #UNESCO #Heritagesite #Farsi