Рет қаралды 220,776
#LawrenceBishnoi #SantoshJadhav #SidhuMoosewala
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या आरोपात महाराष्ट्रातील संतोष जाधवचे नाव शार्पशूटर म्हणून समोर आलंय. संतोष जाधव हा लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची जबाबदारी घेतलीय. गोल्डी ब्रार हा लॉरेन्सचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणात सौरभ महाकाळ, संतोष जाधव, लॉरेन्स बिश्नोई, नवनाथ सूर्यवंशी, गोल्डी ब्रार ही नावं सातत्याने पुढे येतायत. यातली काही नावं महाराष्ट्रातली तर काही पंजाबमधली आहेत. पण या सगळ्यांचा परस्पर संबंध काय? बिश्नोई गॅंग कशी चालते? पंजाब-राजस्थानच्या गॅंगचे महाराष्ट्रीयन सदस्य कसे? असे अनेक प्रश्न आता समोर येतायत.
रिपोर्ट- ओंकार करंबेळकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi