Рет қаралды 4,134
भाजपच्या विजयातील शिलेदार Amit Gorkhe कोण आहेत ?| Mahayuti Government Shapath vidhi | Vishaych Bhari
मंडळी यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अतिशय अभूतपूर्व लागला. शिवसेना - राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर अन बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर 'न भूतो न भविष्यती' असा निकाल लागला. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपने 132, शिवसेनेने 57, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकून, महाराष्ट्र एकहाती जिंकला. मंडळी महाविकास आघाडीची आणि इतर सगळ्या विरोधकांची अशी अवस्था झाली की, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कदाचित पहिल्यांदाच कोणत्याही विरोधी पक्षाला, विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतक्या सुद्धा जागा मिळाल्या नाहीत. मंडळी महाराष्ट्रातील तमाम मतदारांनी महायुतीच्या झोळीत भरभरून दान टाकलं आणि एक भरभक्कम सरकार महायुतीच्या रूपानं महाराष्ट्रातील जनतेनं राज्याला दिलं. त्यात महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरल्याचं एकंदर आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. मंडळी भाजपच्या या महाविजयामागे अनेक चेहरे आहेत, त्यातील एक चेहरा आता समोर येतोय, तो चेहरा आहे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचा. मंडळी भाजपच्या या विजयात अनुसूचित जाती, आणि दलित, वंचितांची निर्णायक मतं भाजपकडं वळवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. मंडळी अगदी हलाखीच्या परिस्थितीमधून पुढं येत आमदारकीपर्यंत मजल मारणारे तसंच दलित आणि बहुजनांमध्ये प्रचंड आदर आणि जनाधार मिळवणारे अमित गोरखे हे सध्या दलित समाजाचा एक आश्वासक चेहरा आणि उभरतं नेतृत्व म्हणून पुढं येत आहेत. मंडळी एक पेपर विक्रेता ते आमदार, ते दलित समाजातील एक उभरतं नेतृत्व, असा प्रवास असणारे अमित गोरखे यांच्या कार्यकर्त्यांकडून आता वारंवार त्यांना राज्यात मोठी संधी द्यावी अशी मागणी केली जातेय. दरम्यान सततच्या मागणीमुळे कदाचित त्यांना येत्या काळात भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असं बोललं जातंय. या व्हिडीओत आपण गोरखे यांच्याबद्दल याच काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#marathinews
#maharashtranews
#mahayuti
#shapathgrahan
#shapathvidhi
#vishaychbhari
#विषयचभारी
marathi news, marathi news live today, abp maza marathi live, election news today, maharashtra news, marathi news today latest, today news marathi, marathi baatmya today, live tv marathi, tv9 marathi live, marathi news today, marathi breaking news, election live news, maharashtra political news, kolhapur news today, news election, maratha reservation news, political news live, today election result, tv9 marathi news, live marathi news, marathi news updates