Рет қаралды 18,854,542
नमस्कार रसिकजनहो !! भगत च्या गाण्याला 10M + म्हणजे एक कोटी पेक्षा जास्त views दिले तुम्ही !!! तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच !! आमचं "लगन ना तरफडा " हे गाणं पण खूप आवडेल तुम्हाला. या लिंक वर ते पण पहा !!
• Lagan Na Tarfada | लगन...
हे गाणं जुनी रुढी आणि नवीन समस्या यावर आधारलेलं काल्पनिक विनोदी रूपक आहे. पूर्वीच्या काळी गावामध्ये लोक देवाकडे जी मागणी करायची असेल ती देवाच्या भगताकडे करत असत. या भगताच्या अंगात देव आल्यावर तो घुमत असे. त्याच्यासमोर गुढी ठेऊन समस्या सांगत. त्यावर तो भगत जो उपाय सांगेल तो मानला जात असे. त्या साठी भगताला गुळ भाकरीचा चुरा, ज्याला अहिराणी भाषेत "गुयना काला" असं म्हटलं जातं, ऑफर केला जातअसे. आज, एक आई आपल्या मुलाचं लग्न जमवण्यासाठी भगताला गुयना काला ऑफर करते. पण तो भगत तिच्या मुलाचे अवगुण सांगून तिची ऑफर नाकारतो. पण ती आई आपल्या मुलाचे अवगुण दुर्लक्षित करून गुणच भगता समोर मांडते. तरी भगत बधत नाही म्हटल्यावर त्याला बकरं कोंबडं आणि देशी ऑफर करते. ही ऑफर भगत स्वीकारतो आणि मुलाचं लग्न त्याच्या मामांच्याच लग्न न जमणाऱ्या मुलीशी लावून देतो. अशी ही पूर्णतः काल्पनिक थीम असून, यामध्ये आजच्या काळातील मुलांच्या लग्नाच्या समस्या वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने मांडली आहे. यात भगत, त्याचे अंगात येणं वगैरे सर्व विनोद निर्मिती साठी वापरलं आहे. यातून अंधश्रद्धा प्रसार करण्याचा कोणताही हेतू अथवा उद्देश नाही.