Рет қаралды 889
Video from Dr. Pradeep Bhadane
Video from Dr. Pradeep Bhadane • मुलं स्वतः शिकू शकतात ... .
*हो मुलं स्वतः शिकू शकतात*. .
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील अनुभव. इयत्ता 1ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करायचे होते. चार टप्प्यात पार पडणाऱ्या प्रशिक्षणात 20 दिवस शाळेत जाता येणार नव्हते. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात मुख्याध्यापकांना सांगून इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्याना आवडते देशभक्तीपर गीत निवडून नृत्य सादर करण्याचे आव्हान दिले*. तीन दिवसात 5-6 विद्यार्थीनी *देश रंगिला रंगिला या गीतावर नृत्याची तयारी केली व फोन करून सांगितलं सर आमचं नृत्य तयार आहे. त्यांच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवत होता व आम्ही स्वतः शिकलो हा आनंदही 👍
शाळेत पाऊल ठेवल्यावर पहिले आमचे नृत्य पहा हा आग्रह धरला. जेव्हा मुलींनी केलेली तयारी पाहिली मी आश्चर्यचकीत झालो. अंजली व जान्हवी आपल्या सोबतच्या मैत्रीणीना सूचना देत होत्या, त्यांच्या जागा सांगत होत्या, विशिष्ट ठिकाणी काय करायचे सांगत होत्या विशेष म्हणजे त्यांच्या या गटात PISA,NAS,ASER तीनही गटातील आणि वेगवेगळ्या सामजिक स्तरातील, वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्वांचा समावेश होता. मुलांना मात्र अजून विश्र्वास वाटत नव्हता की आपण स्वतः शिकू शकतो. मग इयत्ता 1लीं ते 5 वी च्या सर्व विद्यार्थ्याना सर्व घटना क्रम सांगून विद्यार्थिनींना त्यांचे नृत्य सादर करण्याची संधी दिली सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आता सर्व विद्यार्थ्याना आव्हान दिले तुम्ही एक गाणे निवडून प्रत्येक वर्गाने एका नृत्याची तयारी करा 5-6 दिवसात इयत्ता 3 री, 4थी व 5 वी च्या विद्यार्थ्यांनी 4-5 गाण्यावर नृत्याची तयारी केली. पण गडबड झाली इ 4थी व 5वी च्या दोन गटानी एकाच गाण्यावर तयारी केली. मग त्यांना आव्हान दिले तुमच्या पैकी उद्या जो गट उत्कृष्ट सादरीकरण करेल त्या गटाचे नृत्य 26 जानेवारी साठी निवडले जाईल व ही निवड सर्व विद्यार्थ्यांच्या बहुमताने केली जाईल. सर्व वातावरणच बदलून गेले विद्यार्थी जोरदार तयारीला लागले. सर्व विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांना येऊन सांगू लागले, विचारू लागले.दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्याना काही स्टेप शिकवल्या,24 जानेवारीला एका तासात इ. चौथीचे एक नृत्य तयार झाले ,25 जानेवारीला इ. पहिलीच्या मुली शिक्षकांना येऊन सांगू लागल्या आम्हालाही हे नृत्य येत मग फक्त मुलांचे असलेले नृत्य ऐनवेळेस मुल आणि मुली मिळून सादर झालं,25 जानेवारीला दुपारच्या सुटी नंतर अजून एक नृत्य तयार झालं. 26 जानेवारीला कार्यक्रम झाला सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला 6500 रुपयाचे बक्षिस आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवले व ग्राम पंचायत कडून एक संगणक शाळेला देण्याचे जाहिर करण्यात आले.
हो मुलं स्वतः शिकली आम्ही फक्त स्वयं प्रेरणा देण्याचे काम केले, नियोजन केले व नेतृत्व केले*👍. *श्रम निम्मे, काम दुप्पट, आनंद व परिणाम तिप्पट 😊. 🙏🙏🙏🙏🙏. . *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळकोठे ता. पारोळा जि. जळगांव*.
विद्यार्थ्यानी स्वतः तयारी केलेले काही नृत्य. 1) भलगडी गडी दादा भल. • Bhalgadi dada bhal|भल... .
2) देश रंगिला • Desh Rangila|देश रंगिला .
3) नाचत उनी मनी कानबाई (खान्देशी अहिराणी गीत ). • Nachat uni mani kanbai... .
#अध्ययनप्रक्रियेचेव्यवस्थापन
#moli
#manegmentoflearningintervention
#education
#drpradeepbhadane
#funny
#देशरंगीला
#culturaldance
#culturalcelebration
#संस्कृतिककार्यक्रम
##डान्स
#देशभक्ती
#देशभक्तीपरगीत
#देशभक्तिगाने
##प्रजासत्ताक_दिन
#नृत्य