Рет қаралды 2,915
"मुलांसाठी खास गोष्टी आणि नैतिक कथा! आपल्या लहानग्यांच्या कल्पनाशक्तीला उडान देणारे अनुभव, मजेदार कथा आणि जीवनाचे महत्त्व शिकवणारे संदेश. चला, एकत्रितपणे गोष्टींच्या जादुई जगात प्रवेश करूया!"
चिमण्या गोष्टी, मुलांच्या कथा, नैतिक गोष्टी, भारतीय सण, संस्कृती, प्रेरणादायी व्यक्ती, शिक्षण, गोष्टी, महान व्यक्तींच्या कथा, बालकथा
#चतुूर बिरबल
#bodhkatha
#trending
#ytstudio
#chimnyagoshti
*बिरबल काळा कसा झाला*
बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसाची सुंदरता आणि कुरूपता यावर चर्चा चालू होती.
बरेच लोक माणसाच्या कुरूपतेचे स्मरण करूनच हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला वाटत होते की दरबारातील दरबाऱ्यांचे आकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे परंतु काही विचार करून तो गप्प राहीला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोडयाचे वेळात बिरबलला संधी मिळाली तेव्हा त्याने अकबरला विचारले, ‘महाराज! आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात?’
अकबर बोलला, ‘लोकांच्या हसण्याचे कारण तुझी कुरूपता आहे, त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत परंतु बिरबल काळा कसा झाला.’
बिरबल बोलला, ‘मला खेद वाटतो की, आत्तापर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही.’ बादशहा बोलला सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार. जर तुला कुरूपतेचे कारण माहीती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम दूर कर.
बिरबलने उत्तर दिले, ‘महाराज ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीचा निर्माणाला सुरूवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्व प्रथम रूप, दुसर धन, तिसरे बुध्दी, आणि चौथे बल प्रदान केले.
चारी गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुध्दी घेण्यात राहून गेलो जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुध्दीच घेऊन राहून गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालचमध्ये होते. याच कारणामुळे मी कुरूप राहून गेलो.
बिरबलचे हे उत्तर ऐकून बादशहा अकबर व दरबाऱ्यांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलची मजाक कधीच केली नाही.
• शेतात पुरलेले धन| Shet... #learnmarathi #marathimoralstory #englishsubtitles #bodhkatha #viralvideos #jingletoons @shemarookids @Chimnyagoshti @marathimoralstories6909 @JingleToons @JabardastMarathiGoshti @mvf
Email - archanasonawane363@gmail.com