Рет қаралды 35,135
#BolBhidu #SantoshDeshmukh #ManojJarangePatil
मागच्या दोन दिवसांपासून बीडच्या केजमधलं मस्साजोग गाव बंद आहे, गावात मेडिकल सोडलं तर काहीच सुरु नाहीये, भाजीपाल्याची काही दुकानं उघडली असली, तरी तिथं भाजीपाला घ्यायला फार गर्दी नाहीये. कारण गावातल्या कित्येक घरांमध्ये चूल बंद आहे. लोकं आपल्या घरातून बाहेर पडत रस्त्यावर उतरली आहे, कुठं रास्ता रोको आहे, कुठं ठिय्या आंदोलन आहे, लोकांच्या हातात फलक आहेत, ज्यावर लिहिलंय न्याय पाहिजे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करुन हत्या झाली. त्यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.
पण या सगळ्यात संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं बीडमधलं राजकारण सुद्धा तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केजमध्ये सुरु असलेल्या रास्तारोकोला भेट दिली, त्यांच्या मध्यस्थीमुळं आंदोलन थांबवण्यात आलं, पण यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला, खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले, तर ही हत्या घडवून आणणाऱ्यांच्या मागे कुणाचं राजकीय वरदहस्त आहे ? हे शोधून काढण्याची मागणी नागरिकांनी केली. या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं आहे ? यावरुन राजकारण कसं तापलंय, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/