चांगदेव मंदिर मुक्ताईनगर । तापी पूर्णा संगम । Changdev Temple Muktainagar Jalgaon । योगी महाराज

  Рет қаралды 479

Gauravshali Etihas

Gauravshali Etihas

3 ай бұрын

संत चांगदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांचे समकालीन असलेले एक योगी पुरुष होते. या योगी महाराजाचे समाधी मंदिर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या तालुक्याच्या ठिकाणाहून अवघ्या १३ किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे ज्या मुक्ताबाई यांना चांगदेव यांनी गुरु मानले होते त्या मुक्ताबाई यांची समाधी सुद्धा याच परिसरात तापी नदी किनारी मेहून यथे आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर, खान्देशात वसलेले मुक्ताईनगर म्हणजेच जुने आदिलाबाद किंवा एदलाबाद. हे गाव जळगाव जिल्ह्यात भुसावळ व म.प्र. तील बुऱ्हानपूरच्या मध्ये, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वसलेले असून चांगदेव मंदिर हे मुक्ताईनगर येथून जवळच १३ किमी व भुसावळ येथून ३५ किमी अंतराव आहे, तापी व पूर्णा या दोन नदींच्या संगमावर चांगदेव गावाजवळ वसलेले हे चांगदेवाचे प्राचीन समाधी मंदिर व त्या भोवतालच्या इतर मंदिरांचे अवशेष व उत्खननात निघालेल्या कोरीव दगडी मुर्त्या यांच्या महत्वामुळेच हे ठिकाण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मुख्य मंदिर हे नागरशैली प्रकारातील असून त्यावरून ते बाराव्या शतकात बांधलेले असावे. मंदिर हे कमी उंचीच्या जोत्यावर बांधलेले असून मंदिराच्या बाह्य भागावरील भिंतींवर देव देवता व अप्सरा यांची शिल्पे साकारलेली दिसतात. मंदिर हे पूर्वमुखी असून पूर्वेकडील मुख्य प्रवेशव्दार व उत्तर व दक्षिण बाजूने दोन प्रवेशव्दार आहेत. प्रवेशव्दार मधून मंडपात प्रवेश होतो, मंडप चौकोनी असून मंडपाचे छत अस्तित्वात नाही मात्र दगडी खांबांच्या जागा ब भिंतीतील खांब अजूनही दिसतात. नंतर झालेल्या बांधकामामुळे मंडप आज उंच वाटत असला तरी पूर्वी तो इतका उंच नसावा. मंदिराचे अंतराळ चौकोनी असून गर्भगृह आयताकृती आहे. गर्भगृहात मूर्ती स्थापित असून यावरील मूळ शिखर नष्ट झालेले असून आता दिसणारे घुमटाकार शिखर १८ व्या शतकात मराठ्यांच्या काळात बांधलेले आहे. तासलेल्या दगडांनी मुर्त्यांनी सजवलेल्या मंदिरावर नंतर जे विटांमधील बांधकाम केलेले दिसते ते अहिल्याबाई होळकर यांच्या काळात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. येथील मुख्य मंदिराच्या समोर डावीकडे असलेले शिवमंदिर सुद्धा प्राचीन असून अजूनही उभे आहे. गर्भगृहाच्या आत खोलगट भागात शिवलिंग समोरील नंदी व पश्चिम मुखी गाभारा यावरून हेमाडपंथी प्रकारातील मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळातील असावे. विदर्भातील नांदगाव चे खंडेश्वर, व बडनेरा येथील कोंडेश्वर ही शिवमंदिरे हुबेहूब यासारखीच आहेत. परिसरात आणखी काही मंदिरांचे अवशेष असून मंदिरांभोवाताल ठिकठिकाणी विष्णू, शिव, दुर्गा, वरून, शिवलिंग अशा देवदेवतांच्या व अप्सरा, ध्यानस्थ योगी, अशी विविध शिल्पे विखुरलेली दिसतात
Muktainagar formerly known as Edlabad is a small town situated near the National Highway no. 6 in Jalgaon district near the northern border of Maharashtra.
The village of Changdev is 13 kilometers away from Muktainagar District Jalgaon which is located on confluence of River Purna and Tapi, Temple in Nagara style and probably built in 12th centuary and reconstructed in 18th Centuary by Maratha and Ahilyabai Holkar. Temple has Garbhgruh, Antaral and Mandap. Mandap is square in size and roof is missing. Original form of Temple has lost and walls and shikhar build by bricks. Many sculptures and temples ruins can seen around main Changdev Temple.
Category - History & Education
#changdev #temple #fortsofmaharashtra #muktainagar #jalgaon #muktabai #santdnyaneshwar #santdnyaneshwar #vidharbh #samadhi #Historyinmarathi

Пікірлер: 2
@VishnuBade-Varkari
@VishnuBade-Varkari 3 ай бұрын
🙏😊😍🚩🚩🚩🚩🚩
@VishnuBade-Varkari
@VishnuBade-Varkari 3 ай бұрын
अप्रतिम माहिती 😊
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 33 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 66 МЛН
Ramtek Temple Historical Fort Nagpur Maharashtra
27:16
Fly like Wings
Рет қаралды 7 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27