Chicken 65 recipe | चिकन ६५ कसं बनवायचं | चिकन ६५ घरी कसं बनवायचं |

  Рет қаралды 92

Aapal kitchen

Aapal kitchen

Ай бұрын

चिकन ६५ ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे . हॉटेल मध्ये ती स्टार्टर म्हणून ही भेटते. चिकन ६५ साठी चिकन हे नेहमी बोनलेस लागत.
मी आशा करते की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि घरी करायला मदत झाली असेल.
अश्याच चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी आताच माझ्या चॅनेल वर जाऊन sunscribe करा.
साहित्य :
मरीनेशन साठी :
१५० ग्रॅम चिकन बोनलेस
१ चमचा काश्मिरी मिर्ची पावडर
१/२ चमचा धणे पावडर
१/४ चमचा जिरे पावडर
१/२ चमचा काळी मिरी पावडर
१ चमचा आल लसूण पेस्ट
१/२ चमचा लिंबूचा रस
१ बारीक चिरलेली मिर्ची
थोडा बारीक केलेला कडीपत्ता
१/२ चमचा कसूरी मेथी
१/४ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा घट्ट दही
१/२ चमचा मीठ
चिकन तळण्यासाठी :
१ चमचा तांदळाचं पीठ
१/२ चमचा कॉर्न फ्लोअर
१ अंड
थोडासा खायचा रंग (लाल)
तेल
चिकन ला तडका देण्यासाठी :
२ चमचे तेल
५-६ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
१ सूकलेली लाल मिर्ची
२ हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
२ चमचे दही
१ चमचा टोमॅटो सॉस
१ चमचा रेड चिली सॉस
१/४ चमचा काळी मिरी पावडर
बनवायची प्रक्रिया :
१५० ग्रॅम बोनलेस चिकन घ्या. त्यामध्ये घालू १ चमचा
काश्मिरी मिर्ची पावडर, १/२ चमचा घणे पावडर, १/४ चमचा जिरे पावडर, १/२ चमचा काळी मिरी पावडर, १ चमचा आल लसूण पेस्ट, १/२ चमचा लिंबू रस, १ बारीक केलेली हिरवी मिरची, थोडा बारीक केलेला कडीपत्ता, १/२ चमचा कसूरी मेथी , १/४ चमचा सोया सॉस, १ चमचा घट्ट दही, १/२ चमचा मीठ घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. आणि २ तास मारिनेशन साठी बाजूला ठेवू.
२ तासानंतर, त्यामध्ये १ चमचा तांदळाचं पीठ , १/२ चमचा कॉर्न फ्लोअर, १ अंड, थोडा खायचा लाल रंग घालून चांगलं मिक्स करू आणि कडईवर तेल गरम करत ठेवू.
आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये चिकन डीप फ्राय करून घेऊ, ते क्रिस्पी होई पर्यंत फ्राय करा.
चिकन ला तडका देण्यासाठी, कडाई मध्ये २ चमचे तेल घेतले, त्यामध्ये ५-६ बारीक केलेल्या लसूण पाकळ्या, १ सुखी लाल मिरची, २-३ हिरव्या मिरच्या, कडीपत्त्याची पान घालून थोडा लसूण चा रंग बदले पर्यंत भाजून घेऊ. १ वाटी मध्ये २ चमचे दही, १ चमचा टोमॅटो सॉस आणि १ चमचा रेड चिली सॉस घेऊन चांगलं मिक्स करू आणि तडक्यामध्ये घालू. २ मिनिटे शिजवून घेऊयात. आता त्यामध्ये फ्राय केलेले चिकन घालू. वरून १/४ चमचा काळी मिरी पावडर घालू आणि चागलं मिक्स करून घेऊ.
आता तयार झालं चिकन ६५, तुम्ही त्याला कांदा, लिंबू आणि पत्ता गोभी सोबत ही सर्व्ह करू शकता.
रेसिपी पाहील्याबद्दल धन्यवाद.
#chicken65 #chicken65recipe #chicken65inmarathi #chickenrecipe #youtubevideo #youtuberecipevideo #viralvideo #viralrecipe #food #chickenstarterrecipes

Пікірлер: 6
@amitchavan1317
@amitchavan1317 Ай бұрын
👌
@AbhishekPatil-en4dz
@AbhishekPatil-en4dz Ай бұрын
Looks amazing 😍
@subhashpatil9188
@subhashpatil9188 Ай бұрын
Very nice Chicken 65 Recipe.
@SuvarnaChavan31
@SuvarnaChavan31 Ай бұрын
Thank you so much
@amruta55555
@amruta55555 Ай бұрын
Delicious😋
@SuvarnaChavan31
@SuvarnaChavan31 Ай бұрын
Thank you 😋
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47