Рет қаралды 40,172
लहान मूल म्हणजे मातिचा गोळा असतो, त्याला तसा आकार द्यावा तसे ते घडते. या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन त्याची सुंदर मूर्ती बनवण्याची जबाबदारी पालकांची असते.
आपल्या मुलांवर लहानपणी संस्कार कसे करावे, मुलांचे मित्र कसे बनवावे, आपल्या मुलांसोबत कसे वागावे, त्यांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात आणि एक आदर्श पालक कसे बनावे यासाठी या व्हिडिओमध्ये 10 टिप्स तसेच 15 बोनस टिप्स दिलेल्या आहेत. या व्हिडिओचा पालकांना आपल्या मुलांवर बालवयात योग्य संस्कार करण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.