Рет қаралды 22,852
#ढोकळा #dhokala #स्नॅक्स #ब्रेकफास्टरेसिपी #टिफीनरेसिपी #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
ढोकळा
बेसन दीड कप
मीठ १ चमचा
साखर १ चमचा
तेल २ चमचे
हळद पाव चमचा ( ऑप्शनल)
लिंबाचा रस ४ चमचे
हिरव्या मिरच्या २
आलं पाव इंच
इनो १ पॅकेट
फोडणीसाठी : तेल, मोहरी, जिरे, हिंग, २ मिरच्या, कडीपत्ता.
३ चमचे साखर
१ वाटी पाणी
* मिक्सरच्या मोठ्या भांड्यात बेसन, मीठ, साखर, हळद, तेल, आलं, मिरची व थोडे पाणी घालून वाटून घ्यावे.
* पाच मिनिटे तसेच ठेवावे.
* मग त्यात इनो चे एक पॅकेट घालून मिश्रण ढवळून घ्यावे.
* कुकरमध्ये पाणी घालून ते उकळून घ्यावे. कुकरच्या झाकणाला शिट्टी लावू नये.
* एका भांड्याला तेल लावून त्यात ढोकळ्याचे मिश्रण घालावे.
* हे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकरला झाकण लावावे. आता १०-१२ मिनिटे ढोकळा वाफवून घ्यावा.
* एका वाटी पाण्यात साखर घालून ती विरघळवून घ्यावी.
* ढोकळ्यासाठी फोडणी करून घ्यावी व त्यात हे साखर पाणी घालावे.
* वाफवलेला ढोकळा गार झाल्यावर त्यावर ही फोडणी घालावी.
* वरुन थोडी कोथिंबीर घालावी.
* ढोकळा कापून खायला द्यावा.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040