Рет қаралды 2,281
नाताळ सण हा आनंदाचा, आशेचा, शांतीचा व प्रकाशाचा सण आहे. इतिहासातील अद्वितीय अशी घटना २००० वर्षांपूर्वी घडली त्याचे स्मरण मोठ्या श्रद्धेने आज आपण करत आहोत. सर्व वातावरण स्वर्गीय प्रतिकांनी भरलेले आहे. मेंढपाळ घाईघाईने बाळाच्या दर्शनाला आनंदाने येतात. देवाचा एकुलता एक पुत्र मानवाचे कल्याण करण्यासाठी या जगात आला. संपूर्ण सृष्टी स्वर्गीय आनंदाने भरलेली आहे. निसर्गामध्येही बदल होताना दिसत आहे कारण, तारणारा जगात आला आहे. देवाने स्वतःला रिक्त केले आणि मानव देह धारण केला. निर्माताच निर्मिती झाला आहे. मानवाला नवजीवन देण्यासाठी देवाने स्वतःला रिक्त केले आहे. संघर्षमय जगाला शांती देणारा, नैराश्यात जीवन जगणाऱ्यांना आशेचा मार्ग दाखवणारा,
दुखितांना आनंद देणारा आजचा दिवस आहे. ख्रिस्ताच्या जन्माने अखिल जगामध्ये परिवर्तन घडून आले आहे. गरिबीत, विस्थापित परिस्थितीमध्ये देवाचा जन्म झाला आहे. जे अंधारात चालले आहेत त्यांनी प्रकाश पाहिला आहे असे यशया संदेष्टा सांगतो. योसेफ, पवित्र मरिया व बाळ येशू यांचे गरिबीचे व विस्थापितांचे जीवन, आकाशात देवदूत यांचे स्वर्गीय गाणे व पृथ्वीवर मेंढपाळांचा आनंद व उल्हास हा नाताळाचा सणाचा संदेश आहे. नाताळचा आनंद अनुभवूया, नाताळ सण आनंदाने व हर्षाने साजरा करूया.