Рет қаралды 8,996
#bbcmarathi #gaza #isreal #hamas
गाझा युद्धामुळे आतापर्यंत 13 हजारांपेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याचं युनायटेड नेशन्सच्या युनिसेफने म्हटलंय. तर युनायटेड नेशन्सने 1 मार्चला प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार गाझामध्ये इस्रायली सैन्यामुळे आतापर्यंत 9,000 महिलांचा मृत्यू झालाय.
गाझापट्टीच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राफावर जमिनी हल्ला - Ground Operation सुरू करण्याची धमकी इस्रायल गेले काही आठवडे देत आहे. इजिप्तजवळच्या सीमेवरील हे राफा क्रॉसिंग सध्या बंद आहे. पण गाझा पट्टीत सुरू असलेलं युद्ध आणि कधीतरी या क्रॉसिंगद्वारे आपल्याला बाहेर पडता येईल या आशेने या भागात 15 लाख पॅलेस्टाईन निर्वासित गोळा झाले आहेत.
राफामध्ये इस्रायली सैन्याने असा मोठा हल्ला केला तर त्याचे मानवी आयुष्यावर किती भीषण परिणाम होतील याची कल्पनाही करता येणार नाही, अशी भीती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्ट - सारा इब्राहिम, बीबीसी अरेबिक
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi