शिवप्रेम हे आमच्या रक्तातच आहे I चि. अश्मी विनोद मेस्त्रीचे कर्नाळा किल्ल्यावर दमदार भाषण

  Рет қаралды 2,865

Vinod Anant Mestry

Vinod Anant Mestry

Күн бұрын

सरिताच्या वाढदिवसानिमित्त कर्नाळ्याला जायचं ठरलं. मी, सरिता, अश्मी (चिऊ), सुबोध, प्रतिभा, सार्थक, स्वरा (सुनीलची कन्या) आणि माझे दोन भाचे श्लोक आणि श्रवण अशी आमची मावळ्यांची टोळी किल्ला सर करण्यासाठी सज्ज झाली. तसं तर इतक्या छोट्यांना घेवून किल्ला चढणं हे सोपं काम मुळातच नव्हतं. त्यात काळजी होतीच. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत किल्ला चढायआ सुरुवात केली. सूर्य डोक्यावर येतच होता. वाट खडतर होती तरीही सर्वाना मोटीव्हेट करत आम्ही किल्ल्यापर्यंत पोहचलो. परंतु किल्ल्यावर नेणाऱ्या २० ते २५ मोजक्या शिड्या लहान मुलांसाठी धोकादायक वाटल्या. सुबोध म्हणाला मी मुलांना घेवून थांबतो तुम्ही वर जाऊन या. मी सरिता आणि प्रतिभा आम्ही किल्ल्यावर जावून काही मिनिटांतच परतलो. खाली आलो तेव्हा चिऊ फुगली होती. “मला जायचं होतं ना वर...मला बघायचं आहे किल्ला वर कसा दिसतोय तो!”. आम्ही तिची समजूत काढत होतो कि वर जाणं थोडं अवघड आहे. पण ती आपल्या जिद्दीवर कायम राहिली. ती कधीच हट्ट करत नाही. परंतु इथे तिचा निर्धार पक्का होता. तिला महाराजांबद्दल प्रचंड प्रेम आहे. इथवर आली आणि किल्ला पाहता येणार नाही हे तिला मान्य नव्हतं. तिचं ते वेड तिच्या डोळ्यात मी सहज वाचू शकत होतो. ठरवलं तिला किल्ल्यावर न्यायचं.
तिला व्यवस्थित सांभाळत त्या कठीण पायऱ्या चढून किल्ल्यावर नेलं आणि ती भलतीच खुश झाली. महाराजांच्या इतिहासात पुन्हा रमली. एकेक गोष्ट काय असेल याची प्रश्नावली सुरु झाली. गडावर आलेली माणसे तिचं भरभरून कौतुक करत होती. गड फिरत आम्ही स्वराज्याची शान असलेल्या भगव्या झेंड्याजवळ आलो.
तिला मी म्हणालो, “चिऊ झेंड्याखाली तुझा एक फोटो काढूया.”
मस्त वारा सुटला होता आणि झेंडा फडफडत जणू इतिहासाची ग्वाही देत होता. या वातावरणात चिऊला झेंड्याखाली कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना अचानक माझ्या तोंडून निघालं ,
“चिऊ भाषण बोलतेस का?”
मी अचानक विचारलेल्या प्रश्नाने ती क्षणभर गोंधळली. नको म्हणाली.
मी म्हणालो “चिऊ अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. आपण यापुढे कर्नाळ्यावर पुन्हा येणार नाही. आपल्याला आणखी अनेक गड सर करायचे आहेत. बोलून टाक...”
एव्हाना बाप-लेकीचा संवाद ऐकून ८-१० जन मागे जमा झाले होते. माझ्या रुदायाची धडधड वाढली होती.
मनातल्या मनात मी आर्जवे करत होतो “चिऊ हो म्हण...चिऊ हो म्हण.”
“बोलते!” चिमुकलीचा आवाज आला.
‘भले शाब्बास!’ मानाने उसळी घेतली आणि त्यानंतर जे झालं ते ‘शिव’ वेड्या बापाचं एक स्वप्न होतं...
दीड ते पाऊणे दोन तास गड चढून थकलेली असताना, पाण्याचा साठा संपलेला असतना, भूक सतावत असताना त्या रन्हरन्हत्या उन्हात डोक्यावर तळपणाऱ्या सूर्याला न जुमानता न थांबता पूर्ण भाषण सादर केलं. तिची शब्दफेक, हातवारे, चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही मस्तच...
’किती गं तुझी रूपं...कशी गं तुझी काया...दोनच डोळे माझे...उत्सव जातो वाया...’ अशी माझ्या अवस्था झाली होती. तिच्या तोंडून निघणाऱ्या एकेका शब्दागणिक बापाच्या डोळ्याच्या कडा कधी पाणावत गेल्या कळलं नाही. भाषण संपलं. प्रेक्षकांकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!’ ची घोषणा झाली. उपस्थितांकडून तोड भरून कौतुक झालं. मला मात्र मी काय करू काय नको असं झालं होतं. चिऊने आणि मी सर्वांचे आभार मानले. आम्ही खाली उतरायला निघालो आणि चिऊ म्हणाली,
“ बाबा तू त्यांना का नाही सांगितलंस कि तू कोण आहेस?”
“चिऊ तसंही आपण कोण आहोत हे आपल्या तोंडाने सांगायचं नसतं... आपलं काम बोलेल ते खरं...आणि तसंही आज मला ‘विनोद मेस्त्री’ म्हणून माझी ओळख दाखवण्यापेक्षा किल्ल्यावर तडफदार भाषण केलेल्या अश्मी मेस्त्रीचा बाबा म्हणून ओळखलं जाण्याचा काय आनंद होतोय तो मी शब्दांत सांगू शकणार नाही. चिऊ तू जान आहेस आपली आणि आज तुमने बाबामे नयी जान दाल दी.”
“आता पुढचं भाषण रायगडावर!” चिऊ सहजच म्हणाली.
आणि खरोखर किल्ला सर केल्याचा आनंद बाबाच्या हृदयात ओसंडून वाहायला लागला.

Пікірлер: 67
@surajzete2151
@surajzete2151 3 жыл бұрын
खुपचं छान 🚩🚩
@AP_Crazy_Scenes
@AP_Crazy_Scenes 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 चिऊताई तु खुप सुंदर व्याख्यान केलेस...
@samadhanpawar2976
@samadhanpawar2976 3 жыл бұрын
खूपच छान दीदी खरय शिवप्रेम हे रक्तातच असावं लागतं
@uniquehumans4591
@uniquehumans4591 3 жыл бұрын
खूपच सुंदर अश्मी 👌👏👏👏👏🙏
@annasahebbodakhepatil8458
@annasahebbodakhepatil8458 3 жыл бұрын
जय शिवराय चिऊताई,उद्याची यशस्वी व्याख्याती...
@amitjadhav4749
@amitjadhav4749 3 жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩
@sunilnawde9876
@sunilnawde9876 2 жыл бұрын
अप्रतिम 😍🚩👐
@dnyaneshwarmalage1478
@dnyaneshwarmalage1478 3 жыл бұрын
1 number
@nilsurya6592
@nilsurya6592 3 жыл бұрын
Jay bhavani jay shivaji very nice
@ankushkhot4743
@ankushkhot4743 3 жыл бұрын
जय शिवराय
@shrujaarts4083
@shrujaarts4083 3 жыл бұрын
जबरदस्त चिऊ,,
@prandhanawade
@prandhanawade 3 жыл бұрын
🙌♥️🙌
@priyeshbait860
@priyeshbait860 3 жыл бұрын
🚩🚩🙏🌼🌺जय जय शिवराय 🌺🌼🙏🚩🚩
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@vinaywamanse5492
@vinaywamanse5492 3 жыл бұрын
खूप छान ,मस्त एकदम👍👍all the best for future ventures..
@pradeeplomate3766
@pradeeplomate3766 3 жыл бұрын
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद जय शिवराय!!
@nilamwadekar3630
@nilamwadekar3630 3 жыл бұрын
Khupach chan bhashan
@dilipardalkar2068
@dilipardalkar2068 3 жыл бұрын
अप्रतिम भाषण
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद दिलीप जी!
@vitthalambhore5317
@vitthalambhore5317 3 жыл бұрын
👌🙏🙏🙏🙏🚩
@niteenkolekar2852
@niteenkolekar2852 3 жыл бұрын
खूप सुंदर
@prakashpatkar9274
@prakashpatkar9274 3 жыл бұрын
👌👍
@pandharisargar6656
@pandharisargar6656 3 жыл бұрын
Proud of you beta
@audiobooks7440
@audiobooks7440 3 жыл бұрын
Khup chan
@27shwetagangane7
@27shwetagangane7 3 жыл бұрын
खुपच सुंदर. 👍👍👌👌👌♥️♥️♥️
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद श्वेता. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@27shwetagangane7
@27shwetagangane7 3 жыл бұрын
@@VinodMestry ते ही वाचले सर. ते पण खुप छान आहे.👍👌👌👌
@dattahatekar2379
@dattahatekar2379 3 жыл бұрын
अप्रतिम स्पीच 💐💐🙏
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@nandkumarkanbarkar746
@nandkumarkanbarkar746 3 жыл бұрын
Khup khup chhan aahe dialogue delivery sir tumchya kanyech....
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@saurabh.p.supporter7631
@saurabh.p.supporter7631 3 жыл бұрын
Khup chan tai.....🙏🙏🙏🙏🙏
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@BM-el4ip
@BM-el4ip 3 жыл бұрын
Very nice
@suwarnrajprinters6738
@suwarnrajprinters6738 3 жыл бұрын
Nice🔥
@prafullkp8989
@prafullkp8989 3 жыл бұрын
⛳⛳⛳⛳🚩🚩🚩🚩
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद प्रफुल. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@pmdesigns2903
@pmdesigns2903 3 жыл бұрын
जैसे पिता वैसी कन्या
@dr.radhakrishnamaharajakol7335
@dr.radhakrishnamaharajakol7335 3 жыл бұрын
सुंदर
@vaibhavchavan7707
@vaibhavchavan7707 3 жыл бұрын
विनोद सरांचा dialogue आहे तसा बोलला त्यांच्या कन्येने आणि माझ्या अंगावर आता पण तसाच काटा आला जेव्हा सरांचे भाषण ऐकलेले खूप मस्त दीदी, खूपच मस्त..... जय भवानी'जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद वैभव. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@vaibhavchavan7707
@vaibhavchavan7707 3 жыл бұрын
@@VinodMestry sir discription sudha vachl Asha proud honyasarkhya khup kami moments yetat ayushyat ani tumhala chiu sarkh kanya ratn prapt zalay yatch tumche sukh,samadhan ani anand disun yeto..... -love from satara❤️
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
@@vaibhavchavan7707 क्या बात है वैभव! धन्यवाद!!
@sarojinidhanure3367
@sarojinidhanure3367 3 жыл бұрын
प्रिय विनोद, " चिऊ " ताईचं चिव चिव करायचं वय खरं तर पण छत्रपती शिवाजी महाराजांवरच हे भाषण तिच्या तोंडून ऐकताना मी एका वेगळ्याच विश्वात असल्याचा प्रत्यय आला. आनंद, उल्हास, कौतूक साऱ्या भावना समिश्र स्वरूपात माझ्या चेहऱ्यावर, माझ्या मलाच दिसत होत्या. सरिता आणि तुम्ही दोघेही डोळ्यासमोर येतं होता. " शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी " .. ही ओळ आठवली. खरं सांगू कालपासून चार वेळा मी " चिऊचं भाषण " ऐकले. प्रत्येक वेळी आनंदाची एक वेगळीच अनुभूती होत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तो आवेश, टाईमिंग, body language , खरोखर अफलातून. पाठांतर, शब्दांचे उच्चार, क्या बात 👍👍 चिऊ तुमचा अंश.आहे. " शिवप्रेम " रक्तातच आहे हे अगदी खरं आहे. पपांची कला भरली आहे. तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन !! तुमच्यातल्या पालकांना सलाम 🙏🙏 चिऊ बेटा !! 😘😘 खूप सुंदर दमदार शैलीत भाषण केली आहेस. अभिनंदन बेटा !! खरोखर छत्रपती शिवाजी महाराज रक्तातच भिनलेले आहेत. Keep it up 👍👍 खूप मोठी हो पपांसारखी !!!! 😊😊👍👍
@sangrampatil1058
@sangrampatil1058 3 жыл бұрын
उत्कृष्ट रणरागिणी
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद संग्राम. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@sangrampatil1058
@sangrampatil1058 3 жыл бұрын
हो वाचलं...तुमची शब्दावर असणारी पकड लिखाणात सुद्धा जाणवते...तुम्ही खूपच भाग्यवान आहात,असा अनपेक्षित पण मनात अभिमान निर्माण करणार क्षण तुमच्या पदरी आला...वाचताना उर भरून आला..अष्मी ला यश किर्ती लाभो आई जगदंबाचरणीं अशी प्रार्थना करतो
@pradeeplomate3766
@pradeeplomate3766 3 жыл бұрын
Nice video
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@sayaligavde96
@sayaligavde96 3 жыл бұрын
फारच सुंदर 👍👍👍😘...
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद सायली. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@pranali56
@pranali56 3 жыл бұрын
She rocked it.. kudos to her.. ❤️
@jigneshgolambade7134
@jigneshgolambade7134 3 жыл бұрын
⛳⛳⛳जय शिवराय 🙏🙏🙏🙏
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद जिग्नेश. कृपया व्हिडीओखाली दिलेले डिस्क्रिप्शन सुद्धा नक्की वाचा!
@dattaramkalangutkar923
@dattaramkalangutkar923 3 жыл бұрын
Jai bhavani jai shivaji
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@anandwamanse504
@anandwamanse504 3 жыл бұрын
She is amazing
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद आनंद काका!
@fairyreshu
@fairyreshu 3 жыл бұрын
1no chivu. You are unbelievable. Carbon copy of Vinod dada
@manojdeshmukh7764
@manojdeshmukh7764 3 жыл бұрын
जय शिवराय
@jiteshjadhav6902
@jiteshjadhav6902 3 жыл бұрын
खुप छान
@dhirajbhoyar9647
@dhirajbhoyar9647 3 жыл бұрын
Khup chan
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
@जयशिवराय-ट6ड
@जयशिवराय-ट6ड 3 жыл бұрын
सुंदर
@MrMukundsilgari
@MrMukundsilgari 3 жыл бұрын
जय शिवराय
@VinodMestry
@VinodMestry 3 жыл бұрын
धन्यवाद! जय शिवराय!!
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 13 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН