जेव्हा मराठी कलाकारांच्या "आई " पोल खोल करतात 😂🤣

  Рет қаралды 1,999

Cinesrushtii 2.0

Cinesrushtii 2.0

Күн бұрын

नवीन वर्षात भेटीला येणार दाभाडे कुटुंब
‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज
काही दिवसांपूर्वीच दाभाडे कुटुंबीयांनी गुलाबी थंडीत मस्त 'यल्लो यल्लो' हळदीचा जबरदस्त समारंभ साजरा केला. त्यावेळी या दाभाडे कुटुंबाची थोडी तोंडओळख प्रेक्षकांना झालीच. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून ही दाभाडे फॅमिली का फसक्लास आहे, याचा अंदाजही प्रेक्षकांना आला आहे. 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला असून या कुटुंबाला भेटण्याची आता प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेमंत ढोमे यांचे चित्रपट नेहमीच वास्तविकतेला धरून असतात. त्यातील पात्रे नेहमीच आपल्या आजूबाजूची, आपल्या घरातील असतात आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचे वाटतात. असेच एक तुमच्या आमच्या सारखे कुटुंब प्रेक्षकांना 'फसक्लास दाभाडे' मध्ये पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये हसतं-खेळतं दाभाडे कुटुंब दिसत असून भावंडांमधील भांडणे, कुरबुरी यात दिसत आहेत. हे सगळे दिसत असतानाच त्यांच्यातील घट्ट बॉण्डिंगही दिसत आहे. दाभाडेंच्या घरातील या तीन खांबांना भेटणं म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
निर्माते भूषण कुमार म्हणतात, 'फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट कुटुंबातील प्रत्येकासाठी खास असणारा आहे. प्रत्येक वयोगटासाठी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा. हा चित्रपट पाहाताना यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याच घरातील भासेल. चेहऱ्यावर हास्य आणणारा हा चित्रपट आवर्जून बघावा.''
निर्माते आनंद एल राय म्हणतात, 'फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट म्हणजे कुटुंबातील नातेसंबंधांचा उत्सव आहे. जो हास्य, भावना आणि जीवनातील साध्या क्षणांचा आनंद साजरा करतो. हेमंत ढोमे यांची लेखणी आणि दिग्दर्शनाचा नवा दृष्टिकोन प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी उत्सुक आहोत".
चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट आपलासा वाटेल याची खात्री आहे.
खुळ्या भावंडांची ही इरसाल स्टोरी प्रेक्षकांना २४ जानेवारीपासून मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे. #cinesrushtii #fasclassdabhade ‪@tseries‬

Пікірлер: 3
@poojakarekar37
@poojakarekar37 27 күн бұрын
👌👍🙏
@Cinesrushtii2.0
@Cinesrushtii2.0 27 күн бұрын
😍♥️🙏🏻
@Pooja03jully
@Pooja03jully 23 күн бұрын
NMH cha BTS post kara na plz😅
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Episode One | New Saurabh Bhosale Specials | Hasav Ki Radav
35:05
Saurabh Bhosale
Рет қаралды 511 М.
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН