सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावीं । सज्जनवृंदे मनोभावें आधी वंदावीं ॥ १ ॥ संतसंगें अंतररंगे नाम बोलावें । कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥ २ ॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥ ३ ॥ जेणेंकरूनि मूर्ति ठसावें अंतरी श्रीहरीची । ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥ ४ ॥ अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी । एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ॥ ५ ॥