Рет қаралды 44,368
जपानच्या कंपन्यांची लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक ! | मुंबई | DCM Devendra Fadnavis
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis | 26th August 2023
00:27 - जपानचे भारताला मोठ्या प्रमाणात सहकार्य
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून जपान सोबत मजबूत संबंध प्रस्थापित केले. जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना राज्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. जपानच्या मा. पंतप्रधानांच्या मार्गदर्शकांसह विविध स्तरावरील अधिकार्यांसोबत बैठका. JICA संस्थेसोबत बैठक. लवकरच पश्चिमी उपनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मुंबईमध्ये वर्सोवा ते विरार 42 किमी चा सी लिंक. या प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य देण्यास जपान सरकार सकारात्मक. सोबतच मुंबईतील मेट्रो लाइन 11 छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वडाळा ही भुयारी मेट्रो लाइन तयार करण्यासाठी जपान सकारात्मक.
2:30 - टोक्यो पूर नियंत्रण प्रकल्प
मागील काळात सादर केलेल्या पूर नियंत्रण प्रकल्पासाठी जपान अनुकूल. या प्रकल्पामार्फत भुयारी जाळे तयार करून भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी जमा करून ते वापरणे किंवा ओहोटीच्या वेळी समुद्रामध्ये सोडून देणे शक्य. जपानी राज्यपाल आपले व्यापार प्रतिनिधी शिष्टमंडळ घेऊन लवकरच महाराष्ट्रामध्ये येणार. एनटीटी डाटा कंपनी आपली 2 अब्ज डॉलरची महाराष्ट्रातील गुंतवणूक दुप्पट करणार.
3:54 - जपानी उद्योग महाराष्ट्रात आणणे शक्य
जपानी उद्योग महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष टीम गठित करण्याचा भारतीय राजदूत व जेट्रो संस्थेचा सल्ला. काही उद्योजकांसोबतच जपानी भाषेचे ज्ञान असणार्या लोकांची टीम मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या मान्यतेने लवकरच गठित करणार. सेमी कंडक्टर, विविध प्रकारची उत्पादने, डेटा सेंटर तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणित सर्व प्रकारची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणणे शक्य. यासाठी जपानमध्ये एक आणि महाराष्ट्रामध्ये एक टीम काम करणार.
5:20 - नव्या भारताच्या क्षमतेवर जपानचा विश्वास!
पुरवठा साखळीचा भाग म्हणून आतापर्यंत चीनमध्ये केलेली गुंतवणूक जपानी उद्योजकांना असुरक्षित वाटल्यामुळे हे उद्योजक भारतामध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक. आपली गुंतवणूक भारतातच सुरक्षित असल्याचा जपानी उद्योजकांचा विश्वास.
6:09 - मराठी लोकांमार्फत जपानमध्ये मराठमोळे स्वागत!
भारतीय दुतावासामध्ये चांद्रयान मोहिमेच्या लॅंडींगनिमित्त भारतीय लोक जमा. या लोकांसोबत चांद्रयान -3 ची लॅंडींग पाहण्याचा आनंददायी क्षण. जपानस्थित भारतीयांच्या उत्साहामुळे जपानमध्ये आमच्या समोर भारत जिवंत झाला. यासाठी तेथील भारतीयांचे धन्यवाद.
6:59 - कोयासान विद्यापीठाने मानद डॉक्टरेट दिल्याबद्दल आभार. हा महाराष्ट्रचा सन्मान! बुद्धिस्ट संस्कृतीसोबतच संस्कृत आणि भारताच्या संस्कृतीवर देखील या विद्यापीठामध्ये संशोधन.
08:05 - विपक्ष को भारत की सफलता हजम नहीं हो रही
कांग्रेस एक हताश राजनीतिक दल है। अब कांग्रेस पार्टी ने देश के बारे में सोचना बंद कर दिया है। मा. प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत विज्ञान और तंत्रज्ञान के क्षेत्र में तेजी से प्रगति कर रहा है। विपक्ष बेहद ओछी राजनीति पर उतरा आया है। अब विपक्ष से देश की सफलता भी नहीं देखी जा रही है। इससे बुरी विपक्ष की परिस्थिति आजतक नहीं देखी।
9:33 - नाना पटोलेंना कधीच गांभीर्याने घेत नाही
#Maharashtra #Mumbai #देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis