जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करत मतदान करण्याचे केली आव्हान

  Рет қаралды 19

csn news Marathi

csn news Marathi

Күн бұрын

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना
छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी
मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदार मतदान करणार, अशा घोषणा देत यावेळी उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः तर मतदान करुच शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यास सांगू असा निर्धार व्यक्त केला.
केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्ररथातून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी दि.२० पर्यंत मतदार जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे. चित्ररथास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास मार्गस्थ केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर. पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी डॉ .मिलिंद दुसाने स्वीप कक्षाचे सहायक नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, आर जे प्रेषित, आर जे श्रेयस, आरजे अर्चना, आयर्न लेडी ऐश्वर्या, आयर्न मॅन डॉ. प्रफुल्ल जटाले, आघाव जिल्हा स्विप कक्षाचे नोडल अधिकारी स्वप्निल सरदार,तसेच सर्व तालुका स्वीप चे अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये यानिमित्त पथनाट्य ,भारुड व विविध गीतामधून मतदान जाणीव जागृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये हा चित्ररथ फिरणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे येणार आहे, सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केले.

Пікірлер
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,8 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Dávid Gyula: Az Élet, a Világegyetem meg Minden (Atomcsill, 2024.09.12.)
2:30:45
Webinar: Powering Nepal: Strengthening Energy Connectivity and Transmission Lines
1:22:17
Graham Sustainability Institute
Рет қаралды 9 М.
ЛИПСИЦ: ИНТЕРВЬЮ ВИТАЛИЮ ДЫМАРСКОМУ 07.02.2025
55:36
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН