Рет қаралды 23,464
कोकणातील निसर्ग सौंदर्यासोबत आवर्जून उल्लेख केला जातो तो म्हणजे गावातील मंदिरं आणि येथील देवस्थानांचा.. या देवस्थानांना कोकणात विशेष महत्व आहे..
याच देवस्थानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीला खांबकाठी किंवा तरंग असे देखील संबोधले जाते.. या प्रत्येक खांब काठीवर तुम्हाला वेग वेगळे मुखवटे पाहायला मिळतात जे त्या त्या देवतांचे प्रतिनिधित्व करत असतात..
महाशिवरात्रीच्या दिवशी या खांब काठींना नवे कोरे लुगडे गुंडाळून सजवले जाते.. त्यानंतर या खांब काठीची योग्य ती पूजा करून त्यांना गावातील मानकऱ्यांच्या हाती सोपवले जाते.. हि खांब काठी घेणाऱ्याच्या अंगात त्या त्या देवतांचे वारे येते.. हे देवतांचे वारे येण्यापूर्वी एका विशिष्ट पद्धतीने ढोल ताशांचा गजर होतो आणि मग देवाचे वारे चढू लागते.. मग अंगात येणाऱ्या देवतांकडून पुढील कार्यक्रमासाठी कौल घेतला जातो म्हणजेच देवांकडून आज्ञा घेतली जाते.. तो कौल मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ढोल ताशांच्या गजरात सर्व भक्तगण आणि देव आपल्या खांब काठी सोबत मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या तीर्थ क्षेत्रावर अंघोळ करण्यासाठी निघतात.. तिथे पोचल्यावर सर्व भक्तगण देव पाण्यामध्ये उतरण्याची वाट पाहत असतात.. देव एकदाचे पाण्यात उतरल्यावर सर्व भक्तगण देवांना अंघोळ घालण्यासाठी धावून जातात आणि स्वतःही त्या पाण्यात अंघोळ करतात किंवा देवांनी अंघोळ केलेलं पाणी स्वतःच्या अंगावर शिंपडून घेतात..
अंघोळ झाल्यावर काही वेळ देव विश्रांती घेतात आणि खांब काठी आपल्या जागेवर येते.. विश्रांती झाल्यावर खांब काठींचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची रांग लागते.. काहीवेळ सुस्वर भजने देखील गायली जातात..
विश्रांती झाल्यावर पुन्हा हातामध्ये खांब काठी घेऊन देवाचे वारे चढू लागते आणि मग ढोल ताशांच्या गजरात आणि भक्ती गीतांच्या स्वरात नाचत गाजत मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरु होते.. ढोल ताशांच्या तालावर भक्तगण आपल्या नाचाचा बेधुंद होऊन आनंद लुटत असतात.. मृदुंगाच्या तालावर आणि ढोल ताशांच्या जोरावर खांब काठी घेऊन देवही संथ गतीने त्यांच्या नाचात सामील होतात.. या ढोल ताशाच्या आवाजाने आणि भक्ती गीतांनी आजूबाजूचा परिसर अगदी दुमदुमून जातो..
मंदिरात पोचल्यावर काहीवेळ देव भक्तगणांना मार्गदर्शन करतात आणि अखेर सर्वांना खांब काठीद्वारे आशीर्वाद देऊन ती खांब काठी जागेवर ठेवून विश्रांती घेतात..
Connect with me:
Instagram: / lazy_developer21
Facebook: / sanket.sawant.75
Do visit my other channel to experience lovely Marathi Stories
"Kaajwa"
/ @kaajwaa
/ kaajwaa