Рет қаралды 9,781
“एकदा खाल्लं की परत मागाल !बटाटे वड्याची स्पेशल रेसिपी".#Batatavada#vadapav#kolhapurivada#recipes
💠 बटाटे वडा बनवण्याची साहित्य:
1.उकडलेले बटाटे पाच ते सहा
2. आलं लसूण मिरची
3. हळद
4. तळण्यासाठी तेल
5. धने एक चमचा
6. चवीनुसार मीठ
7. कोथिंबीर
8. पाव
9. हरभरा डाळीचे पीठ
10. खाण्याचा सोडा.
💠 बटाटे वडे बनवण्याची कृती:
उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे. फोडणीसाठी एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घालून त्याच्यामध्ये हिंग पावडर मोहरी आणि आलं-लसूण मिरचीची पेस्ट एक चमचा धने एक चमचा हळद पावडर घालून चांगले भाजून घ्यावी .त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश केलेले घालावा ,चवीनुसार मीठ घालावे आणि कोथिंबीर बारीक चिरून परत एकदा मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. त्याचे लहान लहान आवडीनुसार गोळे बनवून घ्यावे.
आता वडे तळण्यासाठी लागणारे बॅटर बनवून घेऊया. त्याच्यासाठी दोन वाटी डाळीचे पीठ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून लागेल तसं पाणी घालून जास्त जाडसर ही नाही आणि पातळही नाही भजी साठी बनवतो तसे बॅटर आपण याच्यासाठी बनवून घ्यायचा .आहे आता आपल्या बॅटर तयार आहे.
आता आपण वडापाव सोबत लागणारी चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी आपण बनवलेल्या बॅटर गरम तेलामध्ये छोटे-छोटे भजी सोडून घ्यायची .लहान लहान भजी याच्यासाठी की ती क्रिस्पी बनत ,लालसर रंग येईपर्यंत त्याला तळून घ्यायचे तळलेले भजे एका बाऊलमध्ये काढून त्याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट कोथिंबीर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आता आपली चटणी वड्या सोबत खाण्यासाठी तयार आहे.
आता आपण वडे तळण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी बनवलेला बटाट्याचा गोळा बॅटरमध्ये दोन्ही साईड ने चांगल्या डीप करून घ्यायचा आणि गरम तेलामध्ये एकेक वडा सोडून घ्यायचा वडा सुद्धा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे त्याचा वरचा कव्हर क्रिस्पी बनते खाण्यासाठी चांगला लागतो आता आपले वडे खाण्यासाठी तयार आहेत.
आपण वडा खाताना मधून पाव कट करून घ्यायचा त्याच्यामध्ये बनवलेली चटणी घालायची त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि मिरची किंवा कांदा सोबत वडे आपण खाऊ शकतो आपला वडा गरमागरम खाण्यासाठी रेडी आहे.
माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा नोटिफिकेशन येईल.
#recipe#vadapav#kolhapurivada#cutvada#batatavada #