Karlyachee kap | कारल्याचे काप | Leena's Sugrankatta

  Рет қаралды 525

Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

Күн бұрын

#सुगरणकट्टा #कारल्याचेकाप #कारले # चटपटीतकाप #श्राद्धाचामेनू #श्राद्धाचेजेवण #लीनाजोशी
कारल्याचे काप
कारलं म्हटले की पहिल्यांदा आठवतो तो त्याचा कडूपणा. कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच अशी म्हण आहे आपल्याकडे. पण असं अजिबात नाही. कारल्याचा कडवटपणा कमी करता येतो. आणि त्याचे पदार्थही टेस्टी बनवता येतात. आज आपण असाच एक पदार्थ बघुया जो मोठी माणसेच काय, लहान मुलेही आवडीने खातील. बघुया, कारल्याचे कुरकुरीत काप कसे बनवायचे ते.
कारल्याचे कुरकुरीत काप
कारली २
तिखट २-३ चमचे
हळद १ चमचा
तांदळाचे पीठ १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
कारली स्वच्छ धुवून घ्या. देठाकडचा आणि खालचा भाग कापून टाका. आता कारले मधोमध कापून घ्या. सोलाण्याच्या साहाय्याने मधला बियांचा भाग खरवडून काढून टाका. नंतर कारल्याचे पातळ गोलाकार काप करा. एका पातेल्यात कारल्याचे काप घालून ते बुडतील एवढे पाणी घाला व त्यात एक टेबलस्पून मीठ घाला. आता हे किमान अर्धा तास तरी तसेच बाजूला ठेवा.
साधारणपणे अर्ध्या तासानंतर कारल्याचे काप पाण्यातून बाहेर काढून चांगले पिळून घ्यावेत. यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो. परत एकदा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
आता हे काप एका ताटात हे काप काढून त्यावर हळद, तिखट, मीठ लावून चोळावे. मग त्यावर तांदळाचे पीठ घालून नीट मिक्स करावे. आणि मुरण्यासाठी १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावेत.
तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करावे. आच कमी करु नये. तेल गरम झाले की लगेचच त्यात थोडे थोडे काप घालून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत.
असे हे काप खायला खूप छान लागतात.
टीप:
१) कारल्यामधे फायबर जास्त असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. तसेच डायबेटिस पेशंट साठी देखील कारले उपयुक्त ठरते.
२) कारल्याच्या कडूपणात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे जरी मी इथे मिठाच्या पाण्यातून काढा असे सांगितले असले तरी तसे भाजी करताना करु नका. शक्यतो कुठलीही भाजी तीच्या गुणधर्मासकट करावी, तरच तिचा फायदा होतो.

Пікірлер: 2
@maneeshakadam3096
@maneeshakadam3096 8 күн бұрын
Leena tai thanks for sharing pitru paksha recipes.. Do also send mix pitache vade recipe...
@shrikantpandit4394
@shrikantpandit4394 8 күн бұрын
Chaan aahe aamhi biya nahi kadhat jar kovalya asalya tar chaan hotat kacharya
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,3 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 28 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19