किल्ले राजगड | Rajgad Fort | स्वराज्याची पहिली राजधानी | गडांचा राजा राजगड |

  Рет қаралды 487

Kunal Bhoye

Kunal Bhoye

Күн бұрын

Instagram LInk- ...
इतिहास - राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
१) 'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे (१ कोस = ३.२ कि.मी ). त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो, 'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.

Пікірлер: 24
@_vruushu_4033
@_vruushu_4033 Жыл бұрын
❤️🔥
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks❤🚩
@jagrutipawar7675
@jagrutipawar7675 Жыл бұрын
Tuzha mehnatila hats off 👏👏
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
@KunalBharsat
@KunalBharsat Жыл бұрын
Nice 👍👌👌👌
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks❤🚩
@balajik437
@balajik437 Жыл бұрын
🚩Very Nice 👍
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
@shrutisingh6246
@shrutisingh6246 Жыл бұрын
♥️
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
@santoshgavali7089
@santoshgavali7089 Жыл бұрын
👌👍
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️
@aniketwaghmare9584
@aniketwaghmare9584 Жыл бұрын
🔥
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
@surajsaroj238
@surajsaroj238 Жыл бұрын
Mast
@ramkolbe4004
@ramkolbe4004 Жыл бұрын
Nice👌
@snehalmahakal2952
@snehalmahakal2952 Жыл бұрын
Superb kunal
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️
@prakashbangar6447
@prakashbangar6447 Жыл бұрын
Pune te rajgad Bus ne kase jayche ??
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे बस सेवा आहे त्यांनी जा
@rahulkamble5185
@rahulkamble5185 Жыл бұрын
❤️
@KunalBhoye01
@KunalBhoye01 Жыл бұрын
Thanks ❤️🚩
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 17 МЛН
MAKING OF LOHGAD FORT, YEAR 2021 |  किल्ले लोहगड
7:39
Arun Nivas Mitra Mandal (Dombivali)
Рет қаралды 404 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН