Рет қаралды 757
अभंग :
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥
वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥
तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
• किर्तनकार ह.भ.प. श्री संजय नाना धोंगडे
• साथ: ह.भ.प. श्री. महेश जी भगुरे गुरुजी आणि ह.भ.प. श्री. प्रविण महाराजथोपटे
• हार्मोनियम: ह.भ.प. श्री. वैभव महाराज बहुरूपी