Рет қаралды 5,314
ह भ प विनोदबुवा खोंड हे घराण्यातील पिढीजात कीर्तनपरंपरा यशस्वीपणे चालवत आहेत. मूळ गाव उमरेड. जिल्हा नागपूर . वयाच्या पंधराव्या वर्षापासून कीर्तनाला सुरुवात केली. चार पिढ्यांपासून घराण्यात कीर्तनाची परंपरा आहे. वडील वेदमूर्ती दत्तात्रय नारायण खोंड उत्तम वैदिक आणि कीर्तनकार होते .
त्यामुळे घरातूनच वारसा मिळाला .कीर्तनकार दादाबुवा देवरस गुरु म्हणून लाभले .आणि नृसिंहवाडीचे दत्तदासबुवा घाग (Dattadasbuwa Ghag or Ghagbuwa) यांचा परिसस्पर्श लाभला . महाराष्ट्र आणि बाहेर हजारो कीर्तने सादर केली . विशेषतः ग्वाल्हेर ,उज्जैन या हिंदी भाषिक प्रदेशात मिळणारा प्रतिसाद नेहमीच उल्लेखनीय असतो. आई वंदनाताई खोंड संगीत अलंकार असल्यामुळे गायनाचे उत्तम धडे मिळाले . आईचे वडील डी आर निंबर्गीबुवा औंध संस्थान चे गायक अनंत मनोहर जोशी यांचे शिष्य होते. आई वडिलांकडून वेद आणि गायनाचा अभ्यास केल्यावर काशी ला दोन वर्षे लक्ष्मीकांत पुराणिक यांच्याकडेही वेदाध्ययन केले . आज या क्षेत्रात 45 वर्षे पूर्ण झाली . विनोदबुवा आपल्या रसाळ कीर्तनांसोबतच परखड विचारांसाठी देखील प्रसिद्ध आहेत .
Contact Details (Mobile No) : 9850333420