राम कृष्ण हरी खुप छान सादरीकरण आपल्या लेकराचे हित कशात आहे या विषयीची चिंता माऊलीचे चित्त त्या आईचे चित्तच वाहत असते. अशी ही कळवळयाची जात आहे कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता प्रेम करत असते. अशी ही विलक्षण जात असणारी माता नऊ महिने त्या मुलाला पोटात वाढवते व त्याचा सर्व त्रास सहन करते. तुकाराम महाराज म्हणतात की हे संत जन हो माझे सर्व परमार्थिक ओझे तुमच्यावरच आहे.