Рет қаралды 12,367
"लाने गो झांजुराचे, हावलु बाय गोरिये गो - होळी कोळी गीत मार्मिक अर्थ/Hidden meaning of Old Holi koli song"
• लाने गो झांजुराचे, हाव...
प्रत्येक कोळीवाड्यात शिमगा अथवा हावली चा अग्निमान म्हणजेच होलिका दहन असले की "लाने गो झांजुराचे" हे कोळीगीत वाजणार नाही व कोळी बांधव त्या गिताच्या मधुर ठेक्यावर कोळी नृत्य करणार नाही हे नवलच!
आजची तरुण पीढ़ी हे गीत आवर्जून ऐकते व नाचते देखील पण ह्या मार्मिक हावलय च्या कोळी गीताचा मतीतर्थ किंवा शब्द क्वचितच कुणाला माहित असावेत.
मुळात आपल्या मुंबईच्या धारावी कोळीवाडा येथील शाहिर गीतकार श्री. बुधाजी शिमगे कोळी उर्फ. लाडके फ्रांसिस काका ह्यांनी ह्या गण्याची रचना केली व त्या सुमधुर मार्मिक कोळी गिताचा गुप्त अर्थ सांगत आहेत आपल्या खार दांडा कोळीवाडा येथील कोळी संस्कृती व जवळ जवळ 100 हुन अधिक कोळी गीतांचे गाढे अभ्यासक श्री. भगवान दांडेकर काका.
गीत अर्थ जाणून घेण्यास खालील video link जरूर पहा:
हावलु बाय गोरिये गो
• लाने गो झांजुराचे, हाव...
Song Lyrics:
लाने गो झांजुराचे हावलाय झांजुराचे, हावळूबाय गोरी ये गो।
पैयाचा धुलेरा गो, हावलाय धुलेरा गो उरेल तुझे मिरीये गो।।धृ०।।
मिरचोली फाटली गो, हावलाय फाटली गो, कोपरा दाटली गो।
चिंता ना परली गो, हावलाय परली गो, पाठीचे बंधवाना।।१।।
बोंबुसा मारीली गो हावलाय मारीली गो, गावाचे मरव्यानी।
होमुसा रचिला गो हावलाय रचिला गो, गावाचे रयतीनी।। २।।
आगन्या लावीली गो हावलाय लावीली गो गावाचे पाटलानी।
सती हाऊल डुलते गो हावलाय डुलते गो अग्नीचे होमामंदी।। ३।।
- Mumbaikar Folks
Special Thanks:
Sri. Bhagvan Dandekar kaka
#shimga #holiSong #rangbarse #rangapanchami #HoliHai #Festival #colours #mumbaispirit #Fun #celebration #AmcheDarashiHaiShimga #OldisGold #AshishChanchlani #HoliStatus #whatsappStatus #HoliVideo #krishna #Raasleela