Рет қаралды 119,638
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवुनिया...
याच विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी मैलोन मैल चालताहेत...
ऊन पावसाचा खेळ सुरू आहेत. मात्र त्याचीही पर्वा न करता वारकरी मजल दरमजल करत अखंड चालताहेत.
त्यातीलच ज्ञानोबा आणि तुकारामांच्या पालख्यांचा आज पहिला रिंगण सोहळा पार पडलाय.
आणि या रिंगण सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी लाखो वारकरी सहभागी झालेत...
तर या वारीतल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठीही शेकडो हात सज्ज आहेत...
वारीतल्या याच माणसातल्या माणूसकीचा मागोवा घेतलाय अभिनेता संदिप पाठकनं...
चला तर अनुभवूयात माझा विठ्ठल माझी वारी...