Рет қаралды 355,403
टायटल :मढिचा देव कानिफनाथ
गायक:एकनाथ बगाड
गीत :विक्रम कवटे
संगीत :डीजे भुषण & विलास डावखर 8793192086
संभळ :रोशन भिसे
पोस्टर: संकेत नवले
:lyrics:
इंद्रदेवान तो हत्ती सोडला वनात
नाथपंथी बाळ जन्म हत्तीच्या कानात
स्वर्गी हात पाय पाताळात मढीचा देव कानिफनाथ। !!धृ!!
रंगपंचमीला देव करूनीया थाट
भगवी झोळी हातीची चिमटा धरुनिया वाट
चालता-चालता चढे धामोरी चा घाट
धामोरी चा घाट अवघड वाट मढिचा देव कानिफनाथ
स्वर्गी हात पाय पाताळात मढीचा देव कानिफनाथ !!1!!
धामोरी गावात गेले पाटील वाड्याला
पाटील वाड्याला याने अल्लख ठोकीला
रागाने बोले पाटील कोणी नाही रे घरात
पाटलाने उगारीला हात मढी चा देव कानिफनाथ
स्वर्गी हात पाय पाताळात मढीचा देव कानिफनाथ। !!2!!
रागाने कानिफनात गेलेत गावाच्या वेशीला
फिरून पाहिले आग लागली वाड्याला
धावत पळत गेला पाटील देवाच्या चरणाला
भस्म देवानं भारीला वाडा आला स्वरूपाला
हात जोडतो या एकनाथ मडीचा देव कानिफनाथ
स्वर्गी हात पाय पाताळात मढीचा देव कानिफनाथ। !!3!!