मी पाहिलेला आदिवासी समाज असाच आहे. गावात राहत असल्याने आदिवासी समाज जवळून ओळखतो. तसेच मनोर, डहाणू येथील आदिवासी समाज, राहणीमान पाहिले आहे. तुमच्या समाजातील अनेक गाणी यु ट्यूबवर पाहायला मिळत आहेत. हे गाणे नक्कीच पाहण्यात येणाऱ्या गाण्यात बेस्ट आहे. कारण बाकी गीतात तेच चेहरे आणि तेच तेच नाच पाहायला मिळतात. त्या सर्वात हे नक्कीच गाणे आणि त्याचे बोल चांगले आहेत. अशीच नावीन्यपूर्ण तसेच अर्थपूर्ण गाणी आल्यास नक्कीच लोक पाहतील अन्यथा तेच डान्स पाहून कंटाळवाणे होते.