खूप सुंदर कथावाचन.कुठेही न अडखळता केलेली शब्दांची फेक,स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चार, लेखकाला अभिप्रेत असणारी कथेतील दृष्ये आणि भावना योग्य रीतीने श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले आवाजातले चढ उतार आणि कथाकथनात रंगत आणण्यासाठी जीवभाव ओतून केलेला भावनाविष्कार अतिशय कौतुकास्पद आहे.इतक्या वर्षांपासून यू ट्यूबवर अनेक कथा ऐकल्या पण आत्तापर्यंत इतकं सुंदर कथाकथन कधीच अनुभवलं नाही.Unique and excellent 👌👌👍👍 .Keep it up.
@RadhikaPharate2 күн бұрын
तुमची ही प्रतिक्रिया वाचून मला तुमचंच कौतुक करू वाटतंय. इतकं बारीक निरीक्षण करण्याची कला आणि साहित्याची आवड दिसून येते. लोकांचं भरभरून कौतुक करण्यासाठी नक्कीच मोठं मन लागतं आणि अर्थात तुमचं ते आहे. आशा करते की तुमच्यापर्यंत अधिकाधिक चांगल्या गोष्टी घेऊन येईन. खूप आभार! पोटभर कौतुक वाचून मनाला उभारी मिळाली❤️
@vijayapurandare804112 күн бұрын
खूप छान
@RadhikaPharate9 күн бұрын
Thank you!🥹
@ajitdeshmukh854411 күн бұрын
नमस्कार राधिकाजी, आपल्या चॅनेल वरील हि पहिलाची कथा माझ्या ऐकण्यात अली. कथा अर्थातच वेगळ्या विश्वात नेणारी आहे. आपले कथावाचन उत्तम आहे. आपली भाषा, योग्य त्या ठिकाणी आवाजातील चढ-उतार, शब्दांचे उच्चरण तथा सादरीकरण उल्लेखनीय आहे. लहाणतोंडी मोठा घास घेतो, पण जर आपण कथेला साजेसे पार्श्व संगीत दिल्यास कथा प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडत असल्याचा भास नक्कीच होईल. हा एक छोटा तांत्रिक बदल आपण जरूर करून पाहावा. आपल्या भावी वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा !!!
@RadhikaPharate9 күн бұрын
नमस्कार! इतकं कौतुक ऐकून खूप बरं वाटतं! 🥰 कृपया लहान तोंडी म्हणू नका, प्रत्येक प्रेक्षक हा तितकाच मौल्यवान असतो! पार्श्वसंगीत देण्याची कल्पना खरोखर मनात तर आहेच, त्या दृष्टीने सुद्धा लवकरच काम करेन🤗 खूप आभारी आहे! तुमच्या अशाच प्रतिक्रियांची फार मदत होते.🌻
@prashantmoghe28227 күн бұрын
खूप छान, तुमची आवाजाची फेक उत्तम आहे .जी ए कुलकर्णी यांच्या कथेचे वाचन कराल का? अवघड आहे! एक चॅलेंज म्हणून घ्या, नक्की यशस्वी व्हाल.
@RadhikaPharate2 күн бұрын
आभारी आहे! नक्कीच मी प्रयत्न करून बघेन! ❤️
@anirudheight87843 күн бұрын
Narayan dharap he majhe atyant aawadte lekhak.... Pan sadly tyanchya kahi kahi Katha khoopach boring aahet, including hi Katha. Ugachach kahitari shabd julavale aahet hya kathe sathi asa watat.... Sad.
@RadhikaPharate2 күн бұрын
हरकत नाही. प्रत्येकाची आवडनिवड, खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. इतर कथा तुम्ही नक्की ऐका. त्या आवडतील अशी आशा करते. 🤗