दुःख अडवायला उभऱ्यासारखा , मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा