Рет қаралды 274,665
मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करायचा असेल तर खड्डे, अर्धवट आणि अरुंद रस्ते, ट्राफिक अशा अडथळ्यांचा सामना करत जावं लागतंय. तब्बल 12 वर्षं या महामार्गाचं काम सुरू आहे, पण आता या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा उद्वेग आणि संताप व्यक्त होतोय. याची दखल नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. रखडलेल्या कामावरुन एका याचिकेवर बोलताना हायकोर्टाने राज्यसरकारला फटकारलं. त्यात स्पष्ट म्हटलं की- 'मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्या विकास प्रकल्पाला परवानगी नाही. महामार्गाच्या कामाचा प्रगती अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करावा. आणि महामार्गावरील खड्डे तीन आठवड्यांमध्ये बुजवण्यात यावेत.'
#mumbaitogoa #goatrip #konkantrip #konkantouristplaces #mumbaigoahighway
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi