Рет қаралды 67,462
|| काकड आरतीचा नमुना ||
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |
पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |
कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||
विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |
कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[६]
सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[६]