पावसाळ्यातील मार्लेश्वर 😍/ Marleswar Waterfall / Kokan Marleswar Temple

  Рет қаралды 190

Rahul_Gurav_Vlog

Rahul_Gurav_Vlog

Ай бұрын

पावसाळ्यातील मार्लेश्वर 😍 / Marleswar Waterfall / Kokan Marleswar Temple
*कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत घनदाट आणि निसर्गरम्य ठिकाणी असणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर या सुप्रसिद्ध देवस्थानाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावाजवळ वसलेले आहे. इथे एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. मारळचा देव म्हणजेच मारळ + ईश्वर असे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर हे नाव पडले असावे. उंच डोंगरावर असलेले हे स्थान हिरव्यागार वनराईने नटलेले आहे. पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहन जाते आणि तेथून एक किलोमीटरचा चढ असून साधारणपणे साडेपाचशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागले. स्वयंभू शिवपिंडी असलेल्या गुहेपर्यंत पायऱ्या बांधलेल्या आहेत.
मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे . या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा दोन स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते . मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरांजनांचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंट मधे सांगा आणि आपल्या चायनल ला subcribe करा.. तुमचं प्रेम असच कायम असूद्या धन्यवाद.
#मार्लेश्वर #मार्लेश्वरधबधबा #rahul_gurav_vlog
फेसबुक इंस्टाग्राम मला फॉलो करा !
facebook :- rahul.gurav....
Instagram :- / rahul_gurav__03

Пікірлер
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Maharashtra Trip with friends ❣️
5:05
Owais.k8yt
Рет қаралды 12