स्वरयज्ञ २०२४ गुरूवर्य पं. गजाननबुवा जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला. डॉ. विकास कशाळकर यांचे ज्येष्ठ शिष्य पवन श्रीकांत नाईक यानी राग - भीमपलास गायन केले. गायन सेवेत बडा ख्याल - जागे मोरे भाग ताल - तिलवाडामध्ये बांधलेला होता, ही बंदिश रचना डॉ. विकास कशाळकर याची आहे. तर छोटा ख्याल - बोलन लागी कोयलिया ताल - त्रितालामध्ये बांधलेला होता, ही रचना पं. कुमार गंधर्व यांची आहे. संवादिनी - कल्याण मुरकुटे, तबला - शेखर दरवडे, सहगायन - मूलांशु परदेशी व निनाद पारखी यानी साथ दिली. श्रृती संगीत निकेतन, अहमदनगर व संगीत विकास सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ व २३ जुन २०२४ संपन्न झाला. महोत्सव गुरूवर्य डॉ. विकास कशाळकर यांच्यासह संपूर्ण जगभरातून २४ गुणी विद्यार्थ्यांनी आपली गायन सेवा दिली. मकरंद खरवंडीकर व डाॅ. धनश्री खरवंडीकर यांच्या विशेष पुढाकाराने व सर्व नगरकर गुरूजन, गुणीजन, साधक व रसिकांच्या साक्षीने सारडा काॅलेज येथील बहुउद्देशीय सभागृहात हा स्वरयज्ञ संपन्न झाला.
@shubhadakher63396 ай бұрын
बहोत बढिया,पवनजी! ❤
@kishordhutadmal56626 ай бұрын
बहोत खूब गुरुजी ❤
@shubhangideshpande55206 ай бұрын
खूप छान 👌 🙏
@sanjayjoshi10006 ай бұрын
खूप छान पवनजी ...
@kaustubhaychitte34986 ай бұрын
मस्तच व्वा पवन क्या बात
@kuldeepchavan52896 ай бұрын
sunder sir and tim🎉🎉🎉
@sanjayshelke3206 ай бұрын
Pawan ji,So nice & beautiful ' Swaryandya 2024' Programme arranged by you & your team 👌👌🙏🙏