Рет қаралды 115,984
#फ्रॅन्की #पोळीचीफ्रॅन्की #पौष्टिकपदार्थ #खाऊचाडबा #पनीरफ्रॅन्की #चीजवेजिटेबलफ्रॅन्की #लीनाजसुगरणकट्टा #लीनाजोशी
पोळीची फ्रॅन्की
फ्रॅन्की मसाला
तिखट २ चमचे
हळद १ चमचा
धणेपूड दीड चमचा
जिरेपूड १ चमचा
गरम मसाला २ चमचे
मिरपूड पाव चमचा
काळं मीठ १ चमचा
आमचूर १ चमचा
मीठ अर्धा चमचा
सगळे एका बाऊलमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करायचे आणि एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत ठेवायचे. आपला फ्रॅन्की मसाला तयार आहे.
फ्रॅन्की क्र. १
एक पोळी/चपाती घ्या. त्याला टोमॅटो केचप लावा. एका बाऊलमध्ये थोडे किसलेले गाजर, किसलेला कोबी, बारीक चिरलेली कांदापात, उभी चिरलेली सिमला मिरची आणि उभा चिरलेला कांदा घालून घ्या. त्यात थोडा फ्रॅन्की मसाला घालून मिक्स करा. आता त्यात २ चमचे मेयॉनीज आणि १ चमचा टोमॅटो केचप घालून परत मिक्स करून घ्या. आता हे सारण पोळीवर एका रेषेत पसरवून टाका. त्यावर मेयॉनीज आणि किसलेले चीज टाका. वरुन परत फ्रॅन्की मसाला पूर्ण पोळीवर टाका. आता पोळीचा घट्ट रोल करून तव्यावर दोन्ही बाजूंनी बटर लावून शेकून घ्या.
फ्रॅन्की क्र. २
पनीरचे बोटभर लांबीचे तुकडे कापून पॅनमध्ये थोड्या तेलावर हे दोन्ही बाजूंनी थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता हे तुकडे एका बाऊलमध्ये काढून त्याला तिखटमीठ लावून घ्या.
आता एका पोळीवर १ चमचा टोमॅटो केचप आणि १ चमचा मेयॉनीज घालून एकत्रित कालवून पसरवून घ्या. त्यावर चिरलेल्या सर्व भाज्या एका रेषेत घालून त्यावर पनीरचे तुकडे ठेवा. वरुन फ्रॅन्की मसाला घाला. वरती थोडे मेयॉनीज लावा. आता पोळीचा घट्ट रोल करून दोन्ही बाजूंनी बटर लावून तव्यावर भाजून घ्या.
आपल्या दोन्ही फ्रॅन्की तयार आहेत.
Video shooting & editing:
Varun Damle
+91 95459 08040