*महाल आणि झोपडी* राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ।।धृ।। महाली मऊ बिछाने, कंदील, शामदाने। आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ।।१।। भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे। प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ।।२।। स्वामित्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे। माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ।।३।। महाला-पुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही। दरकार तिही नाही, या झोपडीत माझ्या ।।४।। जाता तया महाला, 'मत जाव' शब्द आला। भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ।।५।। महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले। ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ।।६।। पहारे आणि तिजोऱ्या, त्यांतूनि होती चोऱ्या। दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ।।७।। महाली सुखे कुणाही? चिंता सदैव राही। झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ।।८।। येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ।।९।। चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा। येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ।।१०।। पाहूनि सौख्य माझे, 'देवेंद्र' तोहि लाजे। शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ।।११।। वाडे, महाल, राणे, केले अनंत ज्याने। तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।। 'तुकड्या' मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी। मूर्ती तुझी राहावी, या झोपडीत माझ्या ।।१३।। रचना- राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज
@PramodPokale-w1q Жыл бұрын
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजरचित ही रचना, आदरणीय पंडित कशाळकर सरांनी सवाई गंधर्व पं.भीमसेन जोशी महोत्सवात अतिशय दिमाखात गाऊन सादर केल्याबद्दल शतशः आभार! (प्रमोद पोकळे, सचिव- श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार संस्था, दासटेकडी गुरुकुंज, जि.अमरावती) 🙏
@prakashsadhale5399 Жыл бұрын
साधारणपणे कशाळीकर तिथे तळवलकर सर वा क्या बात है
@sushmagokhale7489 Жыл бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अभंगाचा उच्चार होणं ही खूप आनंददायी बाब आहे..