Рет қаралды 94,619
रचना - विनायक ताडे (बालमती )
संगीत - आनंद देशपांडे
गायन - आनंद देशपांडे
तबला - निशांत पाठक
Rachana - Vinayak Tade (Balmati)
Sung By - Anand Deshpande
Music By - Anand Deshpande
Tabla - Nishant Pathak
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
नामालागी अर्पूनि जीवन वर्ते जो मानवा
त्याची चिंता जानकी जीवन वाही गे अनुभवा ।।धृ ।।
या स्तव घ्यावे अनन्य भावे रघु रायाचे नाम ।
श्री राम जय राम जय जय राम ।।
जरा तापता बाळ लेकरू माय बावरे काय मी करू
तैसे व्हावे येता आपुल्या नामस्मरणि विराम
श्री राम जय राम जय जय राम ।।१।।
नाम असावा धर्म आपुला
त्यात असावी श्रद्धा विपुला
एकची ईप्सित त्रिलोक स्वामी
भेटावा अभिराम
श्री राम जय राम जय जय राम ।।२।।
नामी ठेवी सदैव बुद्धी
तेणे होईल मानस शुद्धी
शुद्धीतून ये प्रेम बहरूनी
सुखमय हा विश्राम
श्री राम जय राम जय जय राम।।३।।
सहवासाने फुलते प्रीती
अशी पुरातन चाले रीती
मानांतरी नित कौशल्यासूत
हे त्याचे हो धाम
श्री राम जय राम जय जय राम।।४।।
ताका मधले स्नेहल लोणी
मंथन करी जो त्यास लाभणी
मनो रवी ने नाम मंथीता
प्रकटे प्रिय घन श्याम
श्री राम जय राम जय जय राम ।।५।।
रचना - विनायक ताडे (बालमती )
Follow me on Instagram - / anand_deshpande10
Facebook page - profile.php?...
I hope you enjoyed this video