Рет қаралды 44,311
Dev Darshan Gahri 🏠
देव दर्शन घरी च्या ह्या episode च्या माध्यमातून शिरोळ तालुक्या मधील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्तात्रेय देवस्थान मंदीरात आलो आहोत औदुंबर पिठापूर गाणगापूर माहूर गिरनार पर्वत अश्या अनेख श्री दत्तात्रेयांच्या काही प्रमुख तीर्थक्षेत्रा पैकी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी
या गावाला नृसिंहवाडी असे नाव का पडले ? या मागील कारण म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचा पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वतींचा इथे असणारा वास उपस्तिती यावरूनच या गावाला नृसिंहवाडी असे नाव पडले
नृसिंहवाडी हे सामान्यतताह नरसोबा वाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्या मधील एक सुंदर गाव आहे
गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हाजरी न लावल्याने नदीचे पाणी ओसरले आहे पाऊस नसल्याने भाविकांची ही गर्दी दर्शनासाठी प्रचंड आहे मंदिर ही भाविकांसाठी दर्शनास खुले आहे
पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम तीरावर वसलेले हे मंदिर अनेक श्री दत्त भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले आहे. ह्या ठिकाणचे खूप पावित्रय आहे
मंदिरामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी नेहमीच खूप वर्दळ असते
येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान कमिटी कडून सकाळी ११ ते २ या वेळेत वीणा मूल्य महाप्रसाद चे दररोज आयोजन केलेले असते
मंदिराची दिनचार्य
स. ०५:०० वाजता काकड आरती
पादुका पूजन ने होते
०८:०० ते १२:०० रुद्राभिषेक असतो तर १२:३० ते १.३० महापूजा आणि आरती होते
३:०० ते ४:०० या वेळेत पवमान सूक्त पारायण असते तर
सा. ७:३० धूप आरती होते
८:०० पालखी आणि
रात्री १०:०० वाजता शेज आरती
(शेज आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी बंद)
वाडीला भाविकांची दर्शनासाठी नेहमीच खूप वर्दळ असते. पण
दत्त जयंती नरसिंह जयंती गोपाळ कला श्रीपाद श्रीवल्लभ जयंती गुरु पूर्णिमा जयंतीला भाविकांची प्रचंड गर्दी अस्ते
दक्षिणद्वार सोहळा ज्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी उत्तर दरवाजापासून मंदिरातून दक्षिण दरवाजाकडे वाहते
वाडीची भाजी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच वाढीची मिठाई वाढीचे पेढे देखील प्रसिद्ध आहे
मित्रांनो या कलियुगामध्ये तुमचे कर्म नेहमी चांगले ठेवा देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला भेटत राहील
अशीच तुमची भक्ती नेहमी अखंडित श्री गुरुदत्तांवर ठेवा श्री दत्त महाराज देखील त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर ठेवतील🙏🏻🚩🌹