Рет қаралды 34,151
लहानपणी सेवादलात मिळालेला सामाजिक जाणिवेचा वारसा, पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये अलकाझी सरांनी शिकवलेली शिस्त, आणि नंतर निळू फुले, सत्यदेव दुबे ह्यांच्यासारख्या गुरूंकडून मिळालेले उत्स्फूर्त अभिनयाचे धडे ह्या सगळ्याची सांगड घालत गेली ५० वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन आणि अभिरुची-संवर्धन करणाऱ्या ज्येष्ठ आणि प्रसन्न अभिनेत्री ज्योती सुभाष.
'आत्मकथा', 'माझा खेळ मांडू दे', 'वाडा चिरेबंदी', 'एक शून्य बाजीराव', 'अधांतर', 'वासांसि जीर्णानि', 'उणे पुरे शहर एक', 'जिस लाहोर नही देख्या' ह्या नाटकातील ज्योती ताईंच्या भूमिका विशेष गाजल्या. याबरोबरच असंख्य मराठी आणि अमराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. मिळालेल्या कुठल्याही व्यक्तिरेखेच्या अंतरंगात खोलवर उतरून ती अत्यंत सहजतेने आणि विश्वसार्हतेने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात ज्योती ताईंचा हातखंडा आहे. असामान्य निरीक्षणशक्ती, उत्तम वाचिक अभिनय, आणि प्रभावी देहबोली या गुणांसाठी अभिनयक्षेत्रातील लहान-थोर सर्वच कलाकार ज्योती ताईंना मानतात.
आजच्या भागात ऐकूया ज्योती ताईंच्या अभिनय-प्रक्रियेबद्दल - काही प्रात्यक्षिकांसहित !